वासनांध धर्मांधांना कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक !
पुणे – तरुणीसह बळजोरीने शारीरिक संबंध ठेवून त्याचे अश्लील छायाचित्र काढले. छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीकडून ३० लाख रुपये घेतले. या प्रकरणी आरोपी अरबाज सिप्पी, हनीफ सिप्पी यांच्यासह २ महिलांविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०१९ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत ठाणे आणि लोणावळा येथे घडला आहे. या प्रकरणी १९ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपी अरबाज याने तरुणीसह विवाह करणार असल्याचे सांगून तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून तिचे अश्लील छायाचित्र भ्रमणभाषमध्ये काढले. आरोपी अरबाज आणि इतर आरोपींनी तरुणीकडे वारंवार पैशांची मागणी केली, तसेच तक्रारदार यांच्या आई-वडिलांच्या खात्यावरील पैसे, मुदत ठेवीच्या पावत्या मोडून आलेले पैसे, सोन्याचे दागिने गहाण ठेवून मिळालेले पैसे, पीडित तरुणीचे महाविद्यालयाच्या शुल्काचे पैसे असे एकूण ३० लाख रुपये आरोपी अरबाज याने स्वत:च्या आणि वडिलांच्या खात्यावर वर्ग करून घेतले.