१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव भव्य आणि दिव्य होणार’, असे कळल्यावर उत्सुकता निर्माण होणे
‘गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) जन्मोत्सव भव्य आणि दिव्य होणार आहे’, हे ऐकून मला आनंद झाला. ‘तो बघण्याची संधी मिळणार आहे’, हे ऐकल्यावर मनात उत्सुकता निर्माण झाली. ‘महर्षींच्या आज्ञेनुसार जन्मोत्सव भव्य आणि दिव्य होत आहे, ही गुरुदेवांची कृपा आहे, त्या माध्यमातून अनेक साधकांना एकाच वेळी दर्शन देणे, त्यांना आपत्काळात रक्षण होण्यास चैतन्य देणे, अशा अनेक गोष्टी ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने साध्य होणार आहेत’, असे मला जाणवले.
२. ‘रथयात्रेच्या वेळी एका वेगळ्या विश्वात आहे’, असे जाणवणे
प्रत्यक्ष सोहळा पहातांना माझे मन पूर्णपणे निर्विचार झाले. सर्व जण गुरुदेवांच्या दर्शनास आतुर झाले होते. सोनेरी रथात तिन्ही गुरूंचे आगमन झाल्यावर आणि नृत्य अन् गायन यांसह रथाचे मार्गक्रमण होतांना गुरुदेवांसह सर्व जण भावस्थितीत होते. आमच्यासाठी हा भाग्याचा सोहळा होता. त्या वेळी ‘मी एका वेगळ्या विश्वात आहे’, असे मला जाणवले.
आपले गुरु किती थोर आहेत ! त्यांनी सांगितलेले सर्व सत्यात उतरत आहे. याचे आपण साक्षीदार होणे, हे मोठे भाग्य आहे; म्हणून ‘शेवटच्या क्षणापर्यंत सेवा आणि साधना झोकून देऊन करत रहाणे, फळाची अपेक्षा आणि इतर विचार नको’, असे मी ठरवले.’
– श्री. श्रीराम खेडेकर (वय ७० वर्षे), नागेशी, फोंडा, गोवा. (७.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |