(म्हणे) ‘चंद्रयानासमवेत गेलेल्या सर्व प्रवाशांना सलाम !’ – राजस्थानचे क्रीडामंत्री अशोक चंदन

राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्या क्रीडामंत्र्यांचे ‘अ’ज्ञान !

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे क्रीडामंत्री अशोक चंदन

जयपूर (राजस्थान) – ‘चंद्रयान-३’ चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यानंतर देश-विदेशातून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या वेळी राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे क्रीडामंत्री अशोक चंदन यांनीही अभिनंदन केले. पत्रकारांशी बोलतांना ते म्हणालेे, ‘‘आपण यशस्वी झालो आणि सुरक्षित उतरलो. चंद्रयानासमवेत चंद्रावर गेलेल्या प्रवाशांना मी सलाम करतो. आपल्या देशाने विज्ञान आणि अवकाश संशोधनात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे, त्यासाठी मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो.’’ चंद्रयानासमवेत कुठलीही व्यक्ती गेलेली नसतांना अशा प्रकारचे विधान केल्याने अशोक चंदन यांचे अज्ञान उघड होऊन त्यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका करण्यात आली.

ममता बॅनर्जी यांने ‘राकेश शर्मा’ ऐवजी ‘राकेश रोशन’ म्हटले !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चंद्रयानचे कौतुक करतांना वर्ष १९८३ मध्ये रशियाच्या यानातून अंतराळात गेलेले भारतीय वायूदलाचे अधिकारी राकेश शर्मा यांचा उल्लेख करतांना त्यांनी अभिनेते राकेश रोशन यांचा उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावरही सामाजिक माध्यमांतून टीका करण्यात आली.

संपादकीय भूमिका

‘जगाचे ज्ञान आपल्यालाच आहे’, अशा आर्विभावात असणार्‍या भारतीय राजकारण्यांचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, असे कुणी म्हटले, तर चूक ठरू नये !