शीळ-डायघर (ठाणे) येथील महिला पोलिसाला मुसलमान महिलांकडून शिवीगाळ आणि धक्काबुक्की !

ठाणे, १७ ऑगस्ट (वार्ता.) – येथील शीळ-डायघर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस शिपाई ज्योती मुंढे यांना शबनम खान आणि हसीना खान यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या प्रकरणी शीळ-डायघर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या महिला घरगुती वादातून शीळ-डायघर पोलीस ठाणे यथे तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांच्या समक्ष त्या जोर-जोरात गोंधळ घालत होत्या. त्यामुळे पोलीस शिपाई ज्योती मुंढे या त्यांची समजूत काढण्यासाठी गेल्या असता, त्यांना या महिलांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. यात ज्योती यांच्या मानेला दुखापत झाली. त्यानंतर दोघी महिला पोलीस ठाण्याच्या आवारातून पळून गेल्या.

संपादकीय भूमिका 

मुसलमान महिलांना कायद्याचे भय वाटत नसल्याचाच हा परिणाम !