देवाकडे व्‍यवहारातील काही मागू नका, उलट त्‍याला शक्‍य तितके अर्पण करा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘व्‍यावहारिक जीवनामध्‍ये व्‍यक्‍तीला देवाचे महत्त्व केवळ ‘सर्व काही देणारा’, एवढेच ज्ञात असते. त्‍यामुळे काही अल्‍प पडले की, ती लगेच देवाकडे काही ना काही तरी मागते. अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार आपल्‍याला प्रारब्‍धानुसार सुख आणि दुःख भोगायला मिळते. देवाने आपल्‍याला दिलेले तन, मन आणि धन यांतील शक्‍य तितका भाग आपण देवाला अर्पण केला, म्‍हणजे शरिराने सेवा, मनाने नामजप आणि धनाचा त्‍याग केला, तर त्‍यातून आपली पाप-पुण्‍याच्‍या पलीकडील साधना होते. याने सुख-दुःख यांच्‍या पलीकडील आनंदही अनुभवता येतो आणि देव आपल्‍या इच्‍छा त्‍याच्‍याकडे न मागताही पूर्ण करतो.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२५.७.२०२३)