‘देह प्रारब्‍धावरी सोडा, चित्त चैतन्‍याशी जोडा ।’ या ओळीप्रमाणे जीवन जगणार्‍या ठाणे येथील ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. नम्रता ठाकूर (वय ६२ वर्षे) !

‘माझ्‍या विवाहानंतर, म्‍हणजे साधारण वर्ष २०१० पासून मी ठाणे येथील श्री. नंदकिशोर ठाकूरकाका आणि सौ. नम्रता ठाकूरकाकू (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ६२ वर्षे) यांच्‍या संपर्कात आहे. ‘त्‍या दोघांच्‍या प्रेमभावामुळे मला ते वेगळ्‍या कुटुंबातील आहेत’, असे कधी वाटले नाही. सौ. नम्रता ठाकूर या सध्‍या आजारी असून अखंड अनुसंधानात आहेत. मला त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

सौ. नम्रता ठाकूर

१. प्रेमभाव

आम्‍ही पूर्वी कधी काकूंकडे गेल्‍यावर आमच्‍यामुळे त्‍यांना त्रास होऊ नयेे; म्‍हणून ‘आम्‍ही जेवायला नसणार’, असे सांगायचो. तेव्‍हा काकू ते अचूक ओळखायच्‍या आणि प्रेमाने आम्‍हाला जेवल्‍याविना सोडत नसत.

२. अपेक्षा नसणे

सौ. काकू प्रतिदिन सकाळी उठल्‍यावर नामजप करून त्‍यानंतर अल्‍पाहाराची सिद्धता करायच्‍या. त्‍यांना घरातील जमतील, ती सर्व कामे सेवा म्‍हणून करायच्‍या. त्‍यांच्‍या कुणाकडून काही अपेक्षा नसायच्‍या.

३. इतरांशी सहजतेने बोलून त्‍यांना समजून घेणे

त्‍या माझ्‍यापेक्षा वयाने आणि अधिकाराने मोठ्या असूनही त्‍यांना नामजपादी उपाय शोधतांना काही अडचण वाटली, तर त्‍या माझ्‍या समवेत सहजतेने बोलायच्‍या. त्‍या प्रत्‍येक वेळी दुसर्‍याला समजून घेतात.

४. इतरांना साधनेत साहाय्‍य करणे

माझ्‍या चुका लक्षात आल्‍यास मला त्‍या मोकळेपणाने सांगायच्‍या आणि साहाय्‍य करायच्‍या.

श्री. नंदकिशोर ठाकूर

५. व्‍यष्‍टी साधनेविषयी तळमळ

अ. काकूंची व्‍यष्‍टी साधनेची तळमळ पुष्‍कळ आहे. आम्‍ही कधीही त्‍यांच्‍याकडे गेल्‍यावर आमचे व्‍यष्‍टी साधनेविषयी बोलणे व्‍हायचे. त्‍यांच्‍या बोलण्‍यातील विषय नेहमी ‘मी (सौ. ठाकूरकाकू) साधनेत कुठे न्‍यून पडते ? ‘अजून कसे प्रयत्न करायला हवे’, असेच त्‍या मला विचारायच्‍या.

आ. काही वेळा दैनिक ‘सनातन प्रभात’ मिळाले नाही, तर ‘एखादा महत्त्वाचा लेख किंवा नामजपादी उपायांच्‍या संदर्भातील लेख मिळाला नाही’, असे होऊ नये; म्‍हणून त्‍या मला ‘व्‍हॉट्‌सअ‍ॅप’वर पाठवायला सांगत. ‘साधनेच्‍या संदर्भातील आपला महत्त्वाचा भाग राहू नये’, अशी त्‍यांची तळमळ असायची.

६. दृढ श्रद्धा

अ. काकूंना जिल्‍ह्यातील साधकांना नामजपादी उपाय सांगण्‍याची सेवा होती. प्रत्‍येक साधकाला नामजपादी उपाय सांगतांना त्‍या सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांना विचारूनच उपाय पाठवायच्‍या. मी त्‍यांना विचारले, ‘‘तुम्‍ही नामजपादी उपाय सांगतांना भाव काय ठेवता ?’’, म्‍हणजे मलाही शिकता येईल. त्‍या वेळी ‘परम पूज्‍य डॉक्‍टरांनी मला ही सेवा दिली आहे आणि तेच हे सर्व करून घेणार आहेत’, या भावाने मी नामजपादी उपाय शोधते आणि सद़्‍गुरु अनुराधाताईंना पाठवते. ‘प्रत्‍येक क्षणी त्‍यांची गुरुदेवांवर (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावर) दृढ श्रद्धा आहे’, असे मला जाणवले.

आ. ‘सौ. काकूंच्‍या काही वैयक्‍तिक अडचणींमध्‍ये ‘पुढे कसे होणार ?’, असा प्रश्‍न आल्‍यावर ‘आपली काळजी घेणारे परम पूज्‍य डॉक्‍टरच आहेत. तेच आपल्‍याला सांभाळतील’, अशी त्‍यांची श्रद्धा त्‍यांच्‍या बोलण्‍यातून सतत मला जाणवते.

इ. मध्‍यंतरी काकूंचे यजमान (श्री. नंदकिशोर ठाकूर) यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्‍या वेळी काकू थोड्या विचारात असायच्‍या; परंतु त्‍याही परिस्‍थितीत त्‍यांच्‍या मुखात एकच वाक्‍य होते, ‘परम पूज्‍य डॉक्‍टर आहेत, ते बघतील.’

सौ. अनुश्री साळुंके

७. ईश्‍वरी अनुसंधानात असणे

सध्‍या काकूंची प्रकृती ठीक नाही. त्‍यांच्‍याकडे गेल्‍यावर ‘त्‍या पूर्णपणे अनुसंधानात आहेत’, हे लक्षात येते. त्‍यांच्‍या मुखात परम पूज्‍य डॉक्‍टरांचे नाव सतत येते.

८. कृतज्ञताभाव

त्‍या सतत प्रार्थना करून हात जोडून कृतज्ञताही व्‍यक्‍त करतात. त्‍या आजारी असतांना आम्‍ही त्‍यांच्‍याकडे गेलो होतो. तेव्‍हा त्‍यांची सेवा करत असतांना त्‍यांनी आम्‍हा सर्वांना स्‍पर्श करून ‘कृतज्ञता आणि नमस्‍कार’, असे म्‍हटले. त्‍या वेळी त्‍या मनापासून कृतज्ञता व्‍यक्‍त करत होत्‍या.

९. काकू मायेतील बर्‍याच गोष्‍टी विसरल्‍या असून परात्‍पर गुरु डॉ. आठवले, नाम, प्रार्थना आणि कृतज्ञता केवळ इतकेच त्‍यांच्‍या लक्षात असणे आणि ‘हे सर्व बुद्धीच्‍या पलीकडील आहे’, असे वाटणे

त्‍या मायेतील बर्‍याच गोष्‍टी विसरल्‍या आहेत; पण ‘त्‍यांचे अनुसंधान बघून ही स्‍थिती पुष्‍कळ वेगळी आहे’, असे मला जाणवले. ‘आयुष्‍यभर नाम घेतल्‍याने मृत्‍यूच्‍या वेळी नाम आठवते’, यासाठी ‘आतापासून नाम घ्‍या’, असे मी परात्‍पर गुरु डॉक्‍टर आठवले यांच्‍या मार्गदर्शनात ऐकले होते. काकू सर्व विसरल्‍या; पण ‘नाम, परम पूज्‍य (परात्‍पर गुरु डॉ. आठवले), प्रार्थना आणि कृतज्ञता इतकेच सर्व त्‍यांच्‍या लक्षात असून ‘हे बुद्धीच्‍या पलीकडील आहे’, असे मला वाटते.

१०. शारीरिक स्‍थिती गंभीर असूनही सतत भावाच्‍या स्‍थितीत असणे

अ. प्रत्‍यक्षात काकूंना फारसे काही आठवत नाही; परंतु ‘काकूंच्‍या अंतर्मनावर साधनेचा संस्‍कार झाला आहे. त्‍यामुळे साधना त्‍यांच्‍या लक्षात आहे’, असे मला जाणवले. अशा शारीरिक स्‍थितीमध्‍ये बाहेरच्‍या रुग्‍णाची परिस्‍थिती वाईट होते; परंतु काकू पूर्ण भावाच्‍या स्‍थितीत असतात. त्‍यांच्‍या मनात केवळ परम पूज्‍य डॉक्‍टर आणि सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांचेच विचार आहेत.

आ. काकूंच्‍या आजारपणामुळे त्‍यांना काहीच आठवत नव्‍हते; मात्र मी त्‍यांना ब्रह्मोत्‍सवाविषयी सांगितल्‍यावर त्‍यांना सर्वकाही आठवले आणि त्‍या पुष्‍कळ आनंदी झाल्‍या. त्‍यांच्‍या चेहर्‍यावरील भाव पालटले.

११. काकूंच्‍या आजारपणातील स्‍थिती

अ. ‘त्‍यांच्‍याकडे बघून त्‍या आजारी आहेत’, असे वाटत नाही.

आ. ‘त्‍यांची आतून साधना चालू आहे’, असे मला वाटते. ‘त्‍यांच्‍या या स्‍थितीतही त्‍या अनुसंधानात आहेत’, हे पाहून त्‍यांच्‍या ‘जीवनाचे सार्थक झाले’, असे मला वाटते.

इ. ‘देह प्रारब्‍धावरी सोडा, चित्त चैतन्‍याशी जोडा’ या प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या भजनातील ओळीप्रमाणे त्‍यांची स्‍थिती आहे’, असे मला जाणवते.

१२. काकूंमधील ‘भाव, नम्रता, दृढ श्रद्धा, साधनेची तीव्र तळमळ, सकारात्‍मकता, परिस्‍थिती स्‍वीकारणे’, यांसारखे अनेक गुण देवाने माझ्‍या लक्षात आणून दिले.

१३. काकूंची मनापासून काळजी घेणारे त्‍यांचे कुटुंबीय !

श्री. नंदकिशोर ठाकूर (काकूंचे यजमान), कु. मयुरी (काकूंची धाकटी मुलगी), श्री. अंकुर (काकूंचा मोठा मुलगा), सौ. अनन्‍यावहिनी (श्री. अंकुर यांची पत्नी), सौ. शामलताई करंगुटकर (काकूंची वहिनी) हे सर्वच काकूंची पुष्‍कळ मनापासून काळजी घेतात. मयुरी आणि अनन्‍यावहिनी या पुष्‍कळ प्रेमाने त्‍यांना अंघोळ घालण्‍यापासून सर्व साहाय्‍य करतात. ‘या सर्वांमध्‍ये पुष्‍कळ साधकत्‍व आहे’, असे मला जाणवते.

देवाने मला काकूंच्‍या या प्रसंगांतून पुष्‍कळ शिकवले. याबद्दल मी देवाच्‍या चरणी कृतज्ञ आहे. देवा, ‘तुला अपेक्षित अशी साधना तूच माझ्‍याकडून करून घे आणि साधना माझ्‍या अंतर्मनात रुजू दे. आम्‍हा सर्वांनाच तुझ्‍या चरणांशी ठेव’, हीच तुझ्‍या चरणी भावपूर्ण प्रार्थना !’

– सौ. अनुश्री रोहित साळुंके (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ४३ वर्षे) फोंडा, गोवा. (५.८.२०२३)