अमरावती – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मोहनदास गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात येथील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. याविषयी काँग्रेस पक्षाकडून तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीमती यशोमती ठाकूर यांनी २८ जुलै या दिवशी पू. भिडेगुरुजी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी विधानसभेत केली होती.
यवतमाळ येथे कार्यक्रमस्थळी पुरोगामी संघटनांकडून घोषणाबाजी !
यवतमाळ येथे पू. संभाजी भिडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पुरोगामी संघटनांनी कार्यक्रमस्थळी पू. भिडेगुरुजी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. येथे आणि शहरात ठिकठिकाणी लावलेले कार्यक्रमाचे फलक पुरोगाम्यांनी फाडले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ आणि पुरोगामी यांच्यामध्ये मारामारी झाली. पोलिसांनी प्रहार संघटनेचे बिपीन चौधरी, सामाजिक संघटनांचे समन्वयक प्रा. घनश्याम धरणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना कह्यात घेतले. या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.