घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर वसतीगृहाच्या अधिकार्याकडून अन्वेषणाचा आदेश !
अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील अलीगड मुस्लिम विद्यापिठातील (ए.एम्.यू.’तील) ‘सुलेमान’ या वसतीगृहामध्ये एका हिंदु युवकाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना एक मासापूर्वीची असून व्हिडिओमध्ये तीन लोक दिसत आहेत. पीडित युवकाचे नाव आकाश असून त्याला जो युवक पट्ट्याने आणि लाथा-बुक्क्यांनी मारत आहे, त्याचे नाव जैद महंमद असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओत दिसणारा तिसरा युवक हा ए.एम्.यू.चा विद्यार्थी नेता फरहान जुबेरी आहे. पीडित आणि आरोपी हे विद्यापिठातील विद्यार्थी नसल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये आकाश हात जोडून क्षमा मागत असल्याचे दिसत आहे, तसेच त्याला त्याचे नाक महंमदच्या जोड्यावर रगडवण्यास भाग पाडल्याचेही दिसत आहे.
Hindu youth brutally beaten with belt, forced to rub his noes on shoes in Aligarh Muslim University (AMU). Proctor assures investigation.
Video is said to be a month old. pic.twitter.com/bNjKA9KXLF
— Treeni (@_treeni) July 27, 2023
फरहान जुबेरी याने या घटनेविषयी सांगितले की, त्याला मारहाणीच्या घटनेविषयी समजल्यावर त्याने वसतीगृह गाठले आणि आकाशला जैद महंमदपासून सोडवून बाहेर आणले. एका जुन्या प्रकरणाचा राग धरून महंमदने आकाशला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित आकाशने आरोपींच्या विरोधात कोणतीही तक्रार केलेली नाही. मारहाणीच्या घटनेनंतर आकाश शहरातून गायब असून त्याचा भ्रमणभाष बंद आहे. हा व्हिडिओ आता सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर वसतीगृहाच्या अधिकार्याने यासंदर्भात चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
संपादकीय भूमिकादेशात अल्पसंख्य असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |