विवाह करण्‍यास नकार दिल्‍याने शिबू अली याने १४ वर्षीय मुलीला फासावर लटकवले !

वासनांध मुसलमान !

 

छपरा (बिहार) – येथील मुस्‍कान नावाच्‍या एका १४ वर्षीय मुलीची हत्‍या केल्‍याची घटना समोर आली आहे. मुस्‍कान हिच्‍या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, शिबू आणि त्‍याचे कुटुंबीय आमच्‍या मुलीचे शिबूशी लग्‍न लावून देण्‍यासाठी दबाव आणत होते. त्‍यास आम्‍ही नकार दिल्‍याने शिबू अली याने मुस्‍कानला फासावर लटकवून ठार मारले.

मुस्‍कानची आई अजमेरी खातून यांनी पोलिसांना दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, मी ९ जुलै २०२३ य दिवशी सायंकाळी घराबाहेर गेली होती. माझी मुलगी मुस्‍कान एकटीच घरी होती. मी घरी परतले, तेव्‍हा शिबू अली याच्‍या घरातील निजामुद्दीन, गियासुद्दीन, अवदा खातून घरातून बाहेर पडतांना मला दिसल्‍या. यानंतर मी घरात गेले असता माझी मुलगी मृतावस्‍थेत आढळली. मी आरडाओरड केल्‍यावर लोक जमा झाले. त्‍यांनी आरोपींना पकडून पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले. या वेळी शिबू अली पळून गेला.