महाराष्‍ट्राला सर्वाधिक आपत्ती निवारण निधी !

प्रतीकात्मक छायाचित्र

नवी देहली – ओला दुष्‍काळ, पूरग्रस्‍त, पावसाळ्‍यातील हानी आदी आपत्तींसाठी केंद्र शासनाकडून प्रत्‍येक राज्‍याला आपत्ती निवारण निधी दिला जातो. यंदा महाराष्‍ट्राला सर्वाधिक १४२०.८० कोटी रुपयांचा आपत्ती निवारण निधी मिळाला आहे. त्‍यानंतर उत्तरप्रदेशला ८१२ कोटी, ओडिशाला ७०७.६० कोटी आणि गुजरातला ५८४ कोटी रुपये निधी मिळाला आहे. गोव्‍याला ४.८० कोटी रुपयांचा आपत्ती निवारण निधी मिळाला आहे.