सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव म्‍हणजे जीवनातील आनंदाची अत्‍युच्‍च पर्वणी असल्‍याची अनुभूती घेणार्‍या अंधेरी (मुंबई) येथील सौ. अनघा दाभोळकर (वय ५९ वर्षे) !

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सव सोहळ्‍याला उपस्‍थित रहाण्‍याविषयी एका साधिकेचा मला भ्रमणभाष आला आणि त्‍यावर काही क्षण माझा विश्‍वासच बसेना. त्‍याच क्षणी माझ्‍याकडून मनोमन गुरुदेवांप्रती शरणागतभावाने कृतज्ञता व्‍यक्‍त केली. ‘आपण त्‍या सोहळ्‍यातील एक साक्षीदार असू’, हा विचार माझ्‍या मनाला सुखावून गेला. त्‍या वेळी मी अनुभवलेले भावक्षण पुढे दिले आहेत.

सौ. अनघा दाभोळकर

१. रथारूढ झालेल्‍या तीन गुरूंचे  प्रत्‍यक्ष दर्शन झाल्‍यावर आनंद आणि भावावस्‍था अनुभवता येणे

‘प्रत्‍यक्ष ब्रह्मोत्‍सव सोहळा पहातांना मला काय आनंद मिळाला ?’, हे शब्‍दांत वर्णन करणे केवळ अशक्‍य आहे. गुरुदेवांचा रथ जेव्‍हा माझ्‍या जवळून जात होता, तेव्‍हा मी हात जोडून गुरुचरणांशी नतमस्‍तक झालेे. रथारूढ झालेले प्रत्‍यक्ष भगवान श्रीविष्‍णुस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे प्रत्‍यक्ष दर्शन, म्‍हणजे माझ्‍या जीवनातील आनंदाची अत्‍युच्‍चम पर्वणीच ! त्‍या वेळी माझी इतकी भावजागृती झाली की, माझ्‍या डोळ्‍यांतील आनंदाश्रू थांबतच नव्‍हते.

२. कृतकृत्‍य होण्‍याचा (भावभक्‍तीत डुंबवण्‍याचा) हा ४ घंट्यांंचा काळ अविस्‍मरणीय होता. ‘सतत भाव जागृत असणे’, म्‍हणजे काय असते ?’, हे मी तेव्‍हा अनुभवले.

३. सनातनचे संत आणि साधक यांचे ब्रह्मोत्‍सवातील अस्‍तित्‍व, म्‍हणजे माझ्‍यासाठी प्रत्‍यक्ष सत्‍ययुगात असल्‍याची जाणीव होती.

४. कर्नाटकमधील अधिवक्‍ता कृष्‍णमूर्ती (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के) यांनी सांगितलेल्‍या गुरुकृपेविषयीच्‍या अनुभूती ऐकतांना माझी भावजागृती होत होती.

५. सोहळ्‍याची सांगता झाल्‍यानंतर तो सर्वोच्‍च सुखाचा अनुभव घेऊन आम्‍ही घरी परतलो. तो आनंद आता आमच्‍या साधनामार्गात आम्‍हाला पुढे पुढे जाण्‍यासाठी प्रेरणा देत आहे.

श्री गुरुचरणी अखंड कृतज्ञता !’

– सौ. अनघा अशोक दाभोळकर (वय ५९ वर्षे), अंधेरी (प.), मुंबई. (२०.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक