आश्‍वस्‍त करीशी तू तुझ्‍यातील सामर्थ्‍यामुळे ।

कोल्‍हापूर येथे सेवा करणार्‍या कु. माधुरी दुसे यांनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना साधनेचा आढावा देतांना, त्‍या समवेत एक कविता लिहून दिली होती. ती येथे दिली आहे.

कु. माधुरी दुसे

अस्‍थिरता वाढे माझ्‍या अहंमुळे ।
परि तू स्‍थिर करीशी तुझ्‍यातील प्रीतीमुळे ॥ १ ॥

तुज पहाता कृतज्ञतेने डोळे भरूनी येती ।
तुझ्‍या मजवरील प्रीतीमुळे ॥ २ ॥

वाटे मज काळजी माझ्‍या स्‍वभावदोषांमुळे ।
धैर्य देऊनी सोडवीशी तू तुझ्‍यातील दायित्‍वामुळे ॥ ३ ॥

असशी तू जवळी परि मी लाभ न घेई माझ्‍यातील अहंमुळे ।
परि आठवण काढूनी चैतन्‍य देशी तुझ्‍यातील निरपेक्षतेमुळे ॥ ४ ॥

साधना करता पाऊल डगमगे मागेपुढे ।
आश्‍वस्‍त करीशी तू तुझ्‍यातील सामर्थ्‍यामुळे ॥ ५ ॥

अशा आमच्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍याप्रती कृतज्ञता आणि भावपूर्ण नमस्‍कार !’

– कु. माधुरी दुसे, कोल्‍हापूर सेवाकेंद्र, कोल्‍हापूर. (५.७.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक