अमरावती, २४ जून (वार्ता.) – नांदेड येथे गोरक्षकांवर कसायांकडून झालेल्या आक्रमणामध्ये एक गोरक्षकाची हत्या झाली आणि बाकी गोरक्षक गंभीर घायाळ झाले. राज्यात गोहत्याबंदी कायदा असूनही गोतस्करी आणि गोहत्या चालूच असून त्यासाठी प्राण संकटात टाकून कार्य करणार्या गोरक्षकांनाच वेठीस धरले जाते. त्यामुळे या आक्रमणाची तात्काळ विशेष पथक नेमून चौकशी करावी, मृत्यू झालेल्या गोरक्षकांच्या कुटुंबाला साहाय्यता द्यावी, तसेच गोहत्याबंदी कायद्याचे कठोर पालन होण्यासाठी उपाययोजना काढावी, यासाठी अमरावती येथे बजरंग दल, अचलपूर विभागाकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.