जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांना इस्‍लाम धर्माचा पुरस्‍कार करणारे आणि सर्वधर्मसमभावी दाखवण्‍याचा लोकांचा खटाटोप !

संत तुकाराम महाराज

पुणे – तुकाराम गाथेमधील ‘अल्ला देवे अल्ला दिलावे’ हा अभंग सध्‍या काही लोकांकडून सामाजिक प्रसारमाध्‍यमांमध्‍ये मोठ्या प्रमाणात प्रसारित करून ‘जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज हे इस्‍लाम धर्माचा पुरस्‍कार करणारे, तसेच सर्वधर्मसमभावी होते’, असे दाखवण्‍याचा प्रयत्न होत आहे; मात्र तुकाराम गाथेतील या अभंगात तुकोबांनी प्रयत्नवादाचा पुरस्‍कार केला आहे. ‘असेल हरि तर देईल पलंगावरी’ या वृत्तीचा तुकोबांनी निषेध केला आहे. सुखी होण्‍यासाठी मनुष्‍याने भजन रसाची गोळी खायला हवी; कारण खरे सुख देवाच्‍या भजनातच आहे, असे हे तुकोबा सांगतात. त्‍यामुळे संपूर्ण अभंगामध्‍ये तुकोबांनी भजन आणि हरिनाम सोडून इतर उपासनेचा उपदेश केला नाही. त्‍यामुळे या अभंगामधून तुकाराम महाराज हे इतर धर्माचे अनुसरण करायला सांगून सर्वधर्मसमभावाचा उपदेश करतात, हे कुठेही प्रतीत होत नाही, असे खंडण ‘तुका म्‍हणे’ या फेसबुक पेजवरून केले आहे.

संपादकीय भूमिका :

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज कसे होते, हे दाखवण्‍याचा कितीही खटाटोप केला, तरी जे सत्‍य आहे, ते कधीच लपत नसते, हे लक्षात ठेवावे !