१. ब्रह्मोत्सवापूर्वी रथाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !
१ अ. ‘रथातील वायुतत्त्वामुळे रथाच्या दिशेने जातांना हवेत तरंगत जात आहे’, असे जाणवणे : ‘रथाचे सूक्ष्म परीक्षण करण्यासाठी रथाच्या दिशेने जात असतांना ‘माझी पावले भूमीवर पडत नसून मी हवेत तरंगत रथाकडे जात आहे’, असे मला जाणवले. यातून ‘रथात वायुतत्त्व अधिक प्रमाणात आहे’, असे माझ्या लक्षात आले. रथातून प्रक्षेपित होणारे चैतन्य थेट आज्ञाचक्र आणि सहस्रारचक्र यांवर परिणाम करून देहबुद्धी अन् अहं अल्प करत होते. त्यामुळे जिवामध्ये काही प्रमाणात आध्यात्मिक सहजस्थिती (मन आणि बुद्धी यांची कार्यरतता अल्प होणे किंवा ते अंतर्मुख होणे) निर्माण होत होती. ‘त्यामुळे जिवाला आध्यात्मिक अनुभूती अनुभवणे सहज शक्य होते’, असे माझ्या लक्षात आले.
१ आ. रथातून प्रक्षेपित होणार्या निर्गुण तत्त्वामुळे रथापासून ३० ते ५० मीटर अंतरावर असतांना ध्यान लागणे आणि मन निर्विचार होणे : मी रथाच्या दिशेने जात असतांना ‘हळूहळू माझे मन निर्विचार होत आहे’, असे मला जाणवले. मी रथापासून ३० ते ५० मीटर अंतरावर असतांना मला माझ्या आज्ञाचक्रावर संवेदना जाणवू लागल्या. या संवेदना इतक्या तीव्र होत्या की, ‘आता कुठल्याही क्षणी माझे ध्यान लागेल’, असे मला वाटले. तेव्हा रथातून प्रक्षेपित होणार्या निर्गुण तत्त्वामुळे ‘ध्यान लागणे आणि मन निर्विचार होणे’, अशा अनुभूती येत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
१ इ. रथाच्या समोर पोचल्यावर आपोआप माझे हात जोडले जाऊन माझी भावजागृती झाली. ‘मी रथासमोर उभा नसून एका दैवी शक्तीसमोर उभा आहे’, असे मला जाणवले.
१ ई. संपूर्ण रथातून पिवळसर रंगाचे तेज प्रक्षेपित होत असून रथाच्या समोरील खालच्या भागात कोरलेला गरुड त्याच्यातील चैतन्यामुळे जिवंत आणि तेजस्वी दिसणे : रथाकडे पहातांना ‘संपूर्ण रथातून पिवळसर रंगाचे तेज वायूमंडलात प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. रथाकडे समोरून बघतांना माझे लक्ष सतत रथाच्या समोरील खालच्या भागाकडे जात होते. तेव्हा ‘तिथे काहीतरी तेजस्वी दिसत आहे’, असे मला वाटले. तिकडे पाहिल्यावर मला तिथे गरुडाची प्रतिमा कोरलेली दिसली. गरुडाच्या प्रतिमेकडे बघतांना मला ‘त्यातील चैतन्यामुळे गरुड जिवंत असूून तो श्वासोच्छ्वास करत आहे आणि चैतन्याच्या स्तरावर कार्य करत आहेे’, असे जाणवले.
१ उ. रथावर कोरलेली श्रीविष्णुतत्त्व आकर्षित करणारी फुले सजीव असून ‘त्यांतून निळसर रंगाचे दैवी कण तुषारांच्या स्वरूपात प्रक्षेपित होत आहेत’, असे जाणवणे : रथाच्या बाहेरील बाजूने श्रीविष्णुतत्त्व आकर्षित करणार्या फुलांची नक्षी कोरण्यात आली होती. या फुलांकडे पाहिल्यावर ‘ती वैकुंठातील फुले असून सजीव आहेत’, असे मला जाणवत होते. फुलांची वेल आणि फुले यांतून निळसर रंगाचे दैवी कण तुषारांच्या स्वरूपात प्रक्षेपित होत होते. ‘सगुण श्रीविष्णुतत्त्वाचा रंग निळसर असल्यामुळे श्रीविष्णुतत्त्व आकर्षित करणार्या फुलांकडून भाव आणि चैतन्य यांचे प्रतीक असलेले निळसर दैवी कण तुषारांच्या स्वरूपात प्रक्षेपित होत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
१ ऊ. रथावरील ध्वजावर कोरलेल्या ‘सूर्य’ आणि ‘ॐ’ या चिन्हांकडे पाहून ‘सनातन’ असा नामजप चालू होणे : रथाच्या वरील भागावर ध्वज लावण्यात आला होता. या ध्वजाच्या एका बाजूला ‘सूर्यप्रतिमा’ काढली होती आणि दुसर्या बाजूला ‘ॐ’ लिहिले होते. या ध्वजाकडे पाहिल्यावर मला त्यातून चैतन्यमय प्रकाश प्रक्षेपित होतांना दिसला आणि माझा ‘सनातन’, असा नामजप चालू झाला. या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘ध्वज हे तत्त्वाचे प्रतीक असते. यामुळे विशिष्ट देवतातत्त्वासाठी विशिष्ट रंगाचा ध्वज वापरण्यास सांगितले जाते, उदा. कालभैरवासाठी काळा ध्वज. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे समष्टी संत असून त्यांच्यात सर्व देवतांचे तत्त्व आहे. हे तिन्ही गुरु ‘सनातन धर्माशी एकरूप झालेले असल्याने सृष्टीत सनातनचे प्रतीक असलेली ‘सूर्यप्रतिमा’ आणि ‘ॐ’ ही चिन्हे ध्वजावर काढली आहेत. यामुळे ध्वजाकडे बघून ‘सनातन’, असा नामजप चालू झाला.
१ ए. अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींचे जाणवलेले महत्त्व !
१ ए १. ‘संख्याशास्त्रानुसार ‘श्री विष्णवे नम: ।’ हा नामजप श्रीविष्णूच्या अपराशक्ती असलेल्या पंचतत्त्वाचे प्रतीक आहे’, असे जाणवणे : रथाच्या चारही बाजूंना ‘श्री विष्णवे नम: ।’ नामजप लिहिण्यात आला होता. समोरच्या बाजूला ३ वेळा आणि मागच्या बाजूला ३ वेळा, तर वाम (डाव्या) भागात ४ वेळा आणि दक्षिण (उजव्या) भागात ४ वेळा, असा एकूण १४ वेळा ‘श्री विष्णवे नम: ।’ हा नामजप लिहिण्यात आला होता. संख्याशास्त्रानुसार १४ म्हणजे १+४ = ५. यामुळे हे १४ नामजप, म्हणजे ‘श्रीविष्णूची अपराशक्ती असलेल्या पंचतत्त्वाचे प्रतीक आहे’, असे मला जाणवले.
१ ए २. रथाच्या चारही बाजूंनी १४ वेळा लिहिलेले ‘श्री विष्णवे नम: ।’ हे नामजप १४ भुवनांचे प्रतीक आहेत’, असे सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी लक्षात आणून देणे : या संदर्भात मी सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘रथावर लिहिलेले १४ नामजप हे १४ भुवनांचे (सप्तलोक आणि सप्तपाताळ) प्रतीक आहे.’’ तेव्हा ‘रथावर नामजप मंडलाच्या आकारात लिहिला आहेे. या नामजपाने व्यापक मंडल निर्माण होत असून त्यात १४ भुवने समाविष्ट आहेत’, हे माझ्या लक्षात आले.
यातून ‘ईश्वरी लीलेचा भावार्थ आणि खरा अर्थ सूक्ष्म ज्ञानातून नाही, तर अध्यात्मातील अधिकारी असलेले सद़्गुरुच ओळखू शकतात’, हेे मला शिकता आले.
१ ऐ. रथातील विविध भागांकडे पाहिल्यावर शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती येणे : मला रथाच्या चाकांकडे पाहिल्यावर शक्ती, रथावर कोरलेल्या गरुडाकडे पाहिल्यावर भाव, रथावर कोरलेली विष्णुतत्त्व आकर्षित करणारी फुले, शंख, चक्र, सूर्य, चंद्र आणि रथाच्या वरील भागावरील ध्वज अन् घुमट यांच्याकडे पाहून चैतन्य जाणवत होते. रथात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना बसण्यासाठी केलेल्या स्थानांकडे बघितल्यावर आनंद जाणवत होता, तर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना बसण्यासाठी केलेल्या स्थानाकडे बघितल्यावर शांती जाणवत होती. रथाच्या विशिष्ट भागांकडे पाहिल्यावर मला शक्ती ते शांती यांच्या अनुभूती आल्या. त्यामुळे ‘व्यक्तीच्या पातळीनुसार आवश्यक, ती अनुभूती देण्याची क्षमता रथात आहे’, असे मला जाणवले.
२. रथाचे कार्य सगुण आणि निर्गुण दोन्ही स्तरांवर असण्याचा संदर्भात केलेले सूक्ष्म प्रयोग
ईश्वराने मला सूक्ष्म ज्ञानातून सांगितले, ‘रथाचे कार्य स्थुलातून ३० टक्के, तर सूक्ष्मातून ७० टक्के आहे.’ रथाच्या सगुण आणि निर्गुण दोन्ही कार्यांतील तुलनात्मक अंतर समजण्यासाठी मी ‘रथाकडे डोळे उघडे ठेवून बघणे (सगुण), रथासमोर डोळे बंद करून उभे रहाणे (सगुण-निर्गुण) आणि नंतर रथाचे केवळ स्मरण करणे (निर्गुण-सगुण)’, असे प्रयोग करून ‘काय जाणवते ?’, ते पाहिले.
२ अ. रथाकडे डोळे उघडे ठेवून बघणे, रथासमोर डोळे मिटून उभे रहाणे आणि रथाचे मनातल्या मनात स्मरण करणे यांतील तुलनात्मक भेद
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ रथावर आरूढ होण्यापूर्वी आणि आरूढ झाल्यानंतर रथाच्या सूक्ष्म स्तरीय वैशिष्ट्यांमध्ये झालेले पालट
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०२३, सकाळी ९.१५ ते ११.०५ आणि दुपारी ४.१५ ते ६.५५ )
|