पुणे – येथील कोथरूड मतदारसंघातील सर्व महिलांना ‘द केरल स्टोरी’ दाखवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. कोथरूडमधील १० सहस्रांहून अधिक महिला आणि तरुणी यांना ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखवण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली असून आजपर्यंत ५ सहस्रांहून अधिक महिलांनी हा चित्रपट पाहिला आहे. हा चित्रपट विनामूल्य दाखवण्यात येत आहे.
समाजातील ज्वलंत विषय सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी माझ्या कोथरूड मतदारसंघातील महिला व तरुणींना ‘द केरला स्टोरीज’ हा सिनेमा मोफत दाखविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत आज बाणेरमधील महिलांना सिनेमा पाहण्याची व्यवस्था केली असून,
माता -भगिनींसोबत हा ज्वलंत सिनेमा… pic.twitter.com/55P5RyLymj— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 14, 2023