गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

साधकांचे समस्त जीवन व्यापलेले आणि मोक्षाचा मूलाधार असलेल्या कृपेचा वर्षाव करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम् ।
मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा ।। – गुरुगीता, श्लोक ७६

अर्थ : ध्यानाचे आधारस्थान गुरुमूर्ती होय. पूजेचे मूलस्थान गुरुचरण, मंत्राचे उगमस्थान गुरुवाक्य, तर मोक्षाचा मूलाधार, म्हणजे श्री गुरूंची कृपा होय.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

भावार्थ : साधकांच्या जीवनात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच एकमेव आणि सर्वश्रेष्ठ आहेत. त्यामुळे ध्यान करतांना साधकांच्या डोळ्यांसमोर त्यांचेच रूप येते, तसेच पूजा करतांना त्यांचेच मनोहर श्री चरण डोळ्यांसमोर येतात. श्री गुरुवाणीतून प्रगटलेले एकेक वाक्य, त्यांची अमृतमय वाणी साधकांसाठी जगण्याचा अनमोल मंत्रच आहे. ‘अशा श्री गुरूंची परम कृपा होणे’, हाच साधकांसाठी मोक्षाचा मूलाधार आहे. अशा प्रकारे साधकांचे समस्त जीवन ज्यांच्यात सामावले आहे, त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या श्री चरणी आपले जीवन समर्पित करूया !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

(९.५.२०२३)