जम्मू-काश्मीरमधील ७ जिल्ह्यांमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍यांवर एन्.आय.ए.च्या धाडी !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍यांच्या ठिकाणांवर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) जम्मू-काश्मीरच्या ७ जिल्ह्यांत धाडी टाकल्या. अनंतनागमध्ये ४, शोपियामध्ये ३, बडगाम, श्रीनगर आणि पुंछ येथे प्रत्येकी २, तर बारामुल्ला अन् राजौरी जिल्ह्यांत प्रत्येकी एका ठिकाणी धाड टाकण्यात आली. ‘रेझिस्टन्स फ्रंट’, ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट जम्मू अँड कश्मीर’, ‘मुजाहिदीन गजवत-उल्-हिंद’, ‘जम्मू अँड कश्मीर फ्रीडम फायटर्स’, ‘कश्मीर टायगर्स’ यांच्या ठिकाणांवर या धाडी घालण्यात आल्या. ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’सारख्या आतंकवादी संघटनांच्या सहकारी आणि शाखांशी हे सदस्य संलग्न आहेत. एन्.आय.ए.च्या अन्वेषणात या संघटनांचे सदस्य बाँब, आयईडी स्फोटके, रोख रक्कम, अमली पदार्थ आणि लहान शस्त्रे गोळा करून वितरित करायचे काम करतात.

संपादकीय भूमिका

  • आतंकवाद्यांना साहाय्य करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, असा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक !