परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा पहातांना बिहार आणि उत्तरप्रदेश येथील साधिका, तसेच तेथील हिंदुत्वनिष्ठ अन् धर्मप्रेमी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

वर्ष २०२१ मध्ये महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. ‘हा सोहळा सर्व ठिकाणच्या साधकांना पहाता यावा’, यासाठी या सोहळ्याचे प्रक्षेपण करण्यात आले होते. हा कार्यक्रम पाहून बिहार आणि उत्तरप्रदेश येथील साधिका, तसेच हिंदुत्वनिष्ठ अन् धर्मप्रेमी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. बिहारमधील साधिकांना आलेल्या अनुभूती

१ अ. श्रीमती सीमा श्रीवास्तव, सोनपूर, बिहार.

१ अ १. ‘सोहळ्याच्या दिवशी सकाळपासूनच ‘आज परात्पर गुरुदेव घरी येणार आहेत’, असे मला वाटत होते.

१ अ २. सकाळी परात्पर गुरुदेवांची आरती करतांना मला माझ्या शरिरावर पाण्याचे तुषार पडत असल्याप्रमाणे शीतलता जाणवली.

१ अ ३. सोहळ्याच्या दिवशी घरासमोरील मोगर्‍याच्या रोपावरील एक फूल उमलणे आणि गुरुचरणी समर्पित होण्यासाठी उमललेल्या त्या फुलाकडे पाहून भावजागृती होणे : ‘सोहळ्याच्या दिवशी मी घरासमोर लावलेल्या मोगर्‍याच्या रोपावर एक फूल उमलले होते. त्या फुलाकडे पाहून माझ्या मनात विचार आला, ‘हे फूल किती भाग्यशाली आहे ! याची किती साधना आहे ! या फुलाचे परम भाग्य आहे की, ते या सोहळ्याच्या दिवशी गुरुचरणी समर्पित होणार आहे.’ त्या वेळी मीही परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना केली, ‘परात्पर गुरुदेव, माझ्याकडूनही साधना करून घ्या, म्हणजे मीही या फुलाप्रमाणे आपल्या चरणी समर्पित होऊ शकेन.’ जेव्हा मी ते फूल गुरुचरणी अर्पण करण्यासाठी तोडले, तेव्हा माझा भाव जागृत झाला. परात्पर गुरुदेवांनीच संपूर्ण सोहळ्यात माझे मन कृतज्ञताभावात ठेवले.’

१ आ. श्रीमती पूनम राय, गया, बिहार.

१. ‘परात्पर गुरुदेवांचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत अद्भुत होता. सोहळा पहातांना माझी भावजागृती होत होती. त्या वेळी माझे संपूर्ण शरीर रोमांचित होत होते.

२. जेव्हा परात्पर गुरुदेवांना झोपाळ्यावर बसवून हळूवार झोके दिले जात होते, तेव्हा मला वाटले, ‘साक्षात् भगवंतच झोपाळ्यावर बसला आहे.’

२. उत्तरप्रदेशमधील साधिकांना आलेल्या अनुभूती

२ अ. श्रीमती मिथिलेश पाण्डेय, प्रयागराज, उत्तरप्रदेश.

२ अ १. जन्मोत्सवाच्या वेळी परात्पर गुरुदेवांना ‘श्रीरामा’च्या रूपात पाहून प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण होणे : ‘मी जर प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या काळात असते, तर मलाही प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन झाले असते’, असा विचार अनेक वेळा माझ्या मनात येत असे. जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी परात्पर गुरुदेवांना ‘श्रीरामा’च्या रूपात पाहिल्यानंतर ‘माझ्या मनातील प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन घेण्याची इच्छा परात्पर गुरुदेवांनी पूर्ण केली’, याची मला जाणीव झाली.

२ अ २. परात्पर गुरुदेवांच्या डोलोत्सवाच्या वेळी मी डोळे मिटल्यानंतर मला झोपाळ्यावर परात्पर गुरुदेवांच्या ठिकाणी बाळकृष्णच दिसत होता.’

२ आ. श्रीमती सरिता विश्वकर्मा, सैदपूर, उत्तरप्रदेश.

१. ‘जन्मोत्सवाच्या सोहळ्याच्या दिवशी सकाळपासूनच ‘श्रीमन्नारायण, नारायण, नारायण’ हे शब्द पुनःपुन्हा माझ्या मुखात येत होते. सोहळ्याच्या वेळी परात्पर गुरुदेवांना केवळ ‘श्री श्री श्री नाथ, श्रीमन्नारायण नारायण नारायण’, असे आपोआप म्हटले जात होते.

२. सोहळ्याच्या वेळी परात्पर गुरुदेवांचे आणि त्यांच्या चरणांचे दर्शन झाल्यानंतर माझ्या डोळ्यांतील भावाश्रू थांबतच नव्हते.

३. संपूर्ण सोहळ्याच्या वेळी मला वाटत होते, ‘मी एक लहान मुलगी आहे आणि परात्पर गुरुदेवांच्या चरणांना घट्ट मिठी मारून बसले आहे.’

२ इ. कु. कोमल विश्वकर्मा, सैदपूर, उत्तरप्रदेश.

२ इ १. ‘भगवान विष्णु परात्पर गुरुदेवांच्या रूपात अवतरित होऊन आपत्काळात सर्व साधकांचे रक्षण करत आहे’, असे जाणवणे : ‘परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाचा दिव्य सोहळा पाहून माझी भावजागृती होत होती. मला वाटत होते, ‘जसे जलप्रलयाच्या वेळी भगवान विष्णूने मत्स्यावतार घेऊन राजा मनु, सप्तर्षी आणि सर्व भक्त यांचे रक्षण केले होते, तसेच या आपत्काळात भगवान विष्णुच परात्पर गुरुदेवांच्या रूपात अवतरित होऊन आम्हा लेकरांचे रक्षण करत आहे आणि त्याच्याच कृपेने या आपत्काळातही सर्व साधक आनंदात आहेत.’

२ इ २. जेव्हा बालसाधिका परात्पर गुरुदेवांच्या समोर नृत्य सादर करत होती, तेव्हा ‘तिच्या ठिकाणी मीच नृत्य करत आहे’, असे मला वाटले. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला.’

२ ई. श्रीमती सरोज पाण्डेय, अयोध्या, उत्तरप्रदेश.

२ ई १. परात्पर गुरुदेवांची आरती केल्यानंतर ‘आरतीच्या ताटातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे : ‘सोहळ्याच्या दिवशी सकाळी पूजा आणि परात्पर गुरुदेवांची आरती केल्यानंतर मी आरतीचे ताट पूजेच्या ठिकाणी ठेवले. त्या वेळी ‘आरतीच्या ताटातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे आणि पूजेचे ठिकाण म्हणजे एक विशाल खोली आहे’, असे मला जाणवले.

२ ई २. ‘परात्पर गुरुदेवांच्या कृपाशीर्वादामुळे या घनघोर आपत्काळातही सर्व साधक निश्चिंत आहेत,’ असे वाटून संपूर्ण सोहळ्याच्या वेळी कृतज्ञताभावात रहाता येणे : जन्मोत्सवाच्या साेहळ्याच्या वेळी परात्पर गुरुदेवांचे आगमन होत असतांनाचे दृश्य पाहिल्यानंतर माझी भावजागृती झाली. माझ्या डोळ्यांमधून सतत भावाश्रू येत होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘आम्ही साधक अत्यंत भाग्यशाली आहोत. ईश्वराचा वरदहस्त सतत आम्हा सर्व साधकांवर आहे आणि त्यामुळेच आज या घनघोर आपत्काळात आम्ही निश्चिंत होऊन श्वास घेऊ शकत आहोत. परात्पर गुरुदेवांचे श्री चरण नौकेसमान आहेत, ज्यामध्ये आम्ही सर्व साधक त्यांच्या समवेतच विहार करत आहोत.’ संपूर्ण सोहळ्याच्या वेळी माझ्या मनात परात्पर गुरुदेवांच्या प्रती अत्यंत कृतज्ञताभाव होता. हा कृतज्ञताभाव शब्दांत व्यक्त करणे अत्यंत कठीण आहे.’

(ऑगस्ट २०२१)

हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती 

१. श्री. राहुल वर्मा, वाराणसी, उत्तरप्रदेश.

१ अ. परात्पर गुरु  डॉ. आठवले यांच्या असीम कृपेमुळेच सोहळा पहाण्याची संधी मिळणे : ‘आज परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या असीम कृपेमुळेच मला हा दिव्य सोहळा पाहून त्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी लाभली आणि त्यांच्याच कृपेने मी सोहळ्यात सहभागी होऊ शकलो. परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर मला वाटले, ‘साक्षात् गुरुदेवांचे दर्शन घेण्याची माझी इच्छा त्यांच्याच कृपेने पूर्ण झाली.’

१ आ. परात्पर गुरुदेवांची आरती चालू असतांना डोळ्यांतून भावाश्रू येणे आणि त्यांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना होणे : सोहळ्यात परात्पर गुरुदेवांची आरती चालू असतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. त्या वेळी माझ्याकडून परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना झाली, ‘प्रभु, मी कसाही असलो, तरी तुम्ही माझा हात कधीच सोडू नका. प्रभु, आपली कृपा अशीच राहिल्यास आपल्याला जसे अपेक्षित आहे, तसाच मी बनू शकेन.’

२. अधिवक्ता संजीवन यादव, वाराणसी, उत्तरप्रदेश.

२ अ. ‘सोहळ्याच्या ठिकाणी देवता उपस्थित असून त्यांचेच दर्शन होत आहे’, असे वाटणे : ‘सोहळ्याच्या वेळी परात्पर गुरुदेवांची आरती झाली आणि संगीत अन् नृत्य यांचा कार्यक्रम झाला. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोन्ही माता परात्पर गुरुदेव बसलेल्या झोपाळ्याला हळूवार झोका देत होत्या. हे सर्व पाहिल्यानंतर ‘हा सोहळा एका वेगळ्याच लोकात चालू आहे आणि तिथे साक्षात् देवताच उपस्थित असून त्यांचे दर्शन होत आहे’, असे मला वाटले.’

३. श्री. सच्चन सरोज, जौनपूर, उत्तरप्रदेश.

३ अ. ‘आजच्या सोहळ्याचा आनंद शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. आज परात्पर गुरुदेवांच्या दर्शनाने माझे मन आनंदाने भरून आले.

३ आ. मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रथम दर्शन वर्ष २०१० मध्ये स्वप्नात झाले होते. स्वप्नात मला परात्पर गुरु डॉ. आठवले पांढर्‍या शुभ्र प्रकाशाप्रमाणे तेजस्वी दिसले होते.

३ इ. गुरुजींना परात्पर गुरुदेवांविषयी सांगितल्यावर त्यांनी ‘परात्पर गुरु गुरुदेव हे भगवान विष्णूचे अवतार आहेत’, असे सांगणे आणि त्यानंतर परात्पर गुरु गुरुदेवांवरील विश्वास वाढणे : एकदा मी एका साधकाच्या घरी गेलो होतो. तेव्हा तिथे मी परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र पाहिले आणि माझ्या गुरुजींना (पू. पाण्डेय महाराजजी यांना) त्यांच्याविषयी सांगितले. तेव्हा माझ्या गुरूंनी म्हटले होते, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. आज कुणी साधना करत नाही. त्यामुळे सर्वत्र अधर्म पसरलेला आहे. पुढे सर्व लोक त्यांच्याकडेच जाणार आहेत.’’ श्री गुरूंची ही वाणी ऐकून परात्पर गुरु डॉक्टरांवरील माझा विश्वास आणखी वाढला.

३ ई. आजच्या सोहळ्यात परात्पर गुरुदेवांना पाहून माझ्या मनात दृढ विश्वास निर्माण झाला, ‘हेच माझे स्वामी आहेत. माझे इष्ट आहेत.’  (ऑगस्ट २०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक