द केरल स्टोरी’ हा चित्रपट इस्लामी विचारसरणीच्या धोक्यांपासून सावध करणारा ! – नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स

मुंबई – ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट इस्लामी विचारसरणीच्या धोक्यांपासून आणि मुलींच्या बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्याच्या धोक्यांविरुद्ध सावध करणारा आहे. या चित्रपटाचे स्वागत आहे. याला यश मिळो, असे ट्वीट नेदरलँड्स येथील ‘पार्टी ऑफ फ्रिडम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे.

‘द केरल स्टोरी’ चित्रपट नेदरलँडच्या संसदेतही दाखवणार !

दुसर्‍या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले की, मला आशा आहे की, भारतातील आणि जगभरातील माझे सर्व हिंदु मित्र हा चित्रपट पहातील. हा उत्तम चित्रपट युरोपातील लोकांनीही पहावा! चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शहा आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी तो युरोपमधील चित्रपटगृहांतही दाखवावा. तुमची इच्छा असल्यास मी तो आमच्या संसदेत अभिमानाने दाखवीन.

संपादकीय भूमिका

कुठे ‘द केरल स्टोरी’ची दाहकता लक्षात घेणारे युरोपातील संवेदनशील राजकारणी, तर कुठे निवळ मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी ‘लव्ह जिहाद’चे संकट नाकारणारे भारतातील नतद्रष्ट निधर्मी राजकारणी !