गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्यआणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळयांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !

विशेष सदर !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

केवळ स्मरण केल्यावर साधकांना ज्ञान देणारे ज्ञानसूर्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘यस्य स्मरणमात्रेण ज्ञानमुत्पद्यते स्वयम् ।
य एव सर्वसम्प्राप्तिस्तस्मै श्रीगुरवे नमः ।। – गुरुगीता, श्लोक ६९

अर्थ : ज्यांचे केवळ स्मरण केल्यावर आपोआप ज्ञान उत्पन्न होते, जे प्राप्त झाल्यावर सर्वकाही प्राप्त होते, अशा श्री गुरूंना नमस्कार असो.’

भावार्थ : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्म अस्तित्व साधकांसमवेत निरंतर असल्यामुळे ‘त्यांचे केवळ स्मरण केले, तरी साधकांना ते आपल्या समवेतच आहेत’, असे भासते. एखादी अडचण आल्यावर साधकांनी डोळे मिटून केवळ गुरुस्मरण केले, तरी साधकांना ‘श्री गुरूंनी आतून उत्तर दिले’, असे जाणवते.

असे महान गुरु जीवनात आल्यामुळे ‘आता आणखी प्राप्त करण्यासारखे काहीच राहिले नाही’, असा सनातनच्या प्रत्येक साधकाचा भाव आहे. साधकांना स्मरणमात्रे ज्ञान देणार्‍या ज्ञानसूर्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या श्री चरणी कोटीशः नमन !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२.५.२०२३)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक