ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे मौलाना सज्जाद नोमानी यांचे मुसलमान पालकांना आवाहन !
(हिजाब म्हणजे मुसलमान तरुणींचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)
नवी देहली – तुमच्या मुलींना हिजाब घातल्यानंतरही शाळा आणि महाविद्यालये येथे एकटे पाठवू नका. हे हराम (इस्लामनुसार निषिद्ध) आहे. पवित्र रमझानच्या मासामध्ये जे लोक त्यांच्या मुलींना एकटीनेच शिकवणी वर्गाला पाठवतात, त्यांचा मी धिक्कार करतो. अल्ला त्यांना नरकात पाठवेल, असे विधान ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे मौलाना सज्जाद नोमानी यांनी केले आहे. त्यांचा या विधानांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
‘हिजाब पहनाकर भी लड़कियों को अकेले मत भेजो स्कूल-कॉलेज…ये हराम है हराम’ : मौलाना सज्जाद नोमानी का Video, बोले- ‘जहन्नुम में जाओगे’#SajjadNomanihttps://t.co/t1NgZZUigO
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 29, 2023
मौलाना नोमानी पुढे म्हणतात की, या मुली शाळेत जाऊन वर्गात बसतात कि अन्य कुठे जातात, हे त्यांच्या पालकांना ठाऊक असते का ? पालकांनी त्यांच्या मुलींना एकट्याने शाळा किंवा महाविद्यालय येथे जाऊ देऊ नये. त्यांनी प्राचार्यांना भेटून विनंती करावी की, त्यांची मुलगी महाविद्यालयात येऊन वर्गात बसते कि नाही, याची माहिती द्यावी.
इस्लामी विचारवंतांची टीका
नोमानी यांच्या या विधानांवर इस्लामी विचारवंतांनी टीका केली आहे. इंडियन मुस्लिम फॉर सेकुलर डेमोक्रॅसीचे समन्वयक जावेद आनंद म्हणाले की, मला त्यांना विचारायचे आहे की, मुलींना शिक्षणापासून दूर ठेवण्यात यावे, असेच त्यांना या विधानातून सुचवायचे आहे ना ?
संपादकीय भूमिकामहिला संघटना, महिला आयोग, निधर्मी राजकीय पक्ष यांना हे मान्य आहे का ? जर नसेल, तर ते याचा विरोध करतील का ? |