कानपूर (उत्तरप्रदेश) येथे ईदच्या दिवशी रस्त्यांवर नमाजपठण केल्यावरून १ सहस्र ७०० जणांवर गुन्हा नोंद

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाजपठण केल्यावरून पोलिसांनी १ सहस्र ७०० जणांच्या विरोधात ३ पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदवले आहेत. पोलिसांनी थांबवल्यानंतरही २२ एप्रिल या दिवशी जाजमऊ, बाबूपुरवा आणि बेनाझाबर ईदगाहासमोर (नमाजपठणासाठीच्या जागेसमोर) रस्त्यांवर नमाजपठण करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे रस्त्यांवर नमाजपठण करणार्‍यांची ओळख पटवली जात आहे.

बेगमपुरवा पोलीस चौकीचे प्रभारी (काही कालावधीसाठी प्रमुखपद भूषवणारे) बृजेश कुमार यांनी सांगितले की, ईदच्या आधी शांतता कमिटीची बैठक झाली होती. या परिसरातील लोकांनी सांगितले की, रस्त्यावर नमाजपठण केले जाणार नाही. ईदची नमाज केवळ ईदगाह आणि मशिदी येथेच पठण केली जाईल. गर्दीमुळे कुणाचे नमाजपठण चुकले, तर त्याला पुन्हा नमाजपठण करण्याची व्यवस्था पोलिसांकडून केली जाईल. प्रत्यक्षात २२ एप्रिलला ईदच्या दिवशी सकाळी ८ वाजता नमाजपठण होण्यापूर्वी अचानक सहस्रो लोक ईदगाहसमोर गोळा झाले. थांबवल्यानंतरही त्यांनी रस्त्यावर चटई टाकून नमाजपठण केले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी ऐकले नाही. (पोलिसांनी सांगूनही न ऐकणारे मुसलमान कायदाद्रोहीच ! अशांविषयी तथाकथित कायदाप्रेमी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)