२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्तचा सोहळा पहातांना फरीदाबाद (हरियाणा) येथील साधकांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

१ . सौ. सीमा शर्मा

१. ‘सोहळा चालू होण्यापूर्वी मला पुष्कळ शारीरिक त्रास होत होता. सोहळ्यानंतर गुरुकृपेने माझा त्रास उणावला.

२. ‘ॐ जय जगदीश हरे’, ही आरती चालू असतांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील दोन्ही ज्योती एकरूप होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आरती करत आहेत’, असे मला अनुभवायला मिळाले.’

२. श्री. सुरेश मुंजाल

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला वहाण्यासाठी फुले आणण्यास गेल्यावर बागेतील प्रत्येक फूल श्री गुरुचरणी समर्पित होण्यासाठी आतुर असल्याचे जाणवणे : ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या आधी गुरुदेवांच्या छायाचित्राला वहाण्यासाठी फुले आणायला मी घराच्या आवारातील बागेत गेलो होतो. तेव्हा ‘प्रत्येक फूल श्री गुरुचरणी समर्पित होण्यासाठी आतुर आहे’, असे मला वाटले.

२ आ. सदाफुलीची ५ फुले तोडल्यावर ती गुरुचरणी वहातांना त्यांतील एक फूल न मिळणे आणि पुन्हा बागेत गेल्यावर एका पांढर्‍या फुलाने ‘गुरुचरणी समर्पित करण्यासाठी मला का नेले नाही ?’, असे म्हटल्यावर भाव जागृत होणे : मी सदाफुलीची ५ फुले तोडली. घरात येऊन ती गुरुचरणी वहातांना मला त्यांतील एक फूल दिसत नव्हते. ते मला शोधूनही मिळाले नाही; म्हणून मी आणखी एक फूल आणण्यासाठी पुन्हा बाहेर गेलो. तेव्हा एक पूर्ण फुललेले पांढरे फूल मला म्हणाले, ‘श्री गुरुचरणी समर्पित करण्यासाठी मला का नेले नाही ? ’ तेव्हा माझा भाव जागृत झाला. मी ते फूल तोडून आत घेऊन आलो. आधी जे एक फूल मिळत नव्हते, ते तिथेच खाली पडलेले होते.

२ इ. भावसोहळा संपल्यानंतर श्री गुरुचरणी शेवटी वाहिलेले फूल पूर्णतः उमललेले असून ‘जणू गुरुदेवांनी त्या फुलामध्ये आनंद आणि चैतन्य भरले आहे’, असे वाटून भावाश्रू येणे आणि मन आनंदी अन् उत्साही होणे : भावसोहळा संपल्यानंतर सर्व फुले कोमेजली होती; परंतु सर्वांत शेवटी आणलेले फूल पूर्णतः फुलले होते. ‘गुरुदेवांनी जणू त्या फुलामध्ये आनंद आणि चैतन्य भरले होते’, असे वाटून माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले. सोहळ्यापूर्वी आजारपणामुळे माझे मन निरुत्साही झाले होते. सोहळ्यानंतर माझे मन पुष्कळ आनंदी अन् उत्साही झाले. हा आनंद दिल्याबद्दल मला गुरुदेवांच्या प्रती कृतज्ञता वाटत होती.

३. सौ. राज बाला यादव

३ अ. भाजी करतांना तिचे गरम तुकडे हाता-पायांवर पडून कुठेही न भाजणे : त्या दिवशी सायंकाळी मी भाजी करत होते. त्या वेळी कांदे अन् टोमॅटो यांचे गरम तुकडे माझ्या हाता-पायांवर पडले; परंतु मला कुठेही भाजल्याचे फोड आले नाहीत आणि कुठेही भाजल्याच्या खुणासुद्धा दिसल्या नाहीत. तेव्हा माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.’

४. सौ. सुमन राणा

अ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाचा सोहळा चालू असतांना माझा नामजप आपोआप चालू होता. मला पुष्कळ चांगले वाटत होते.

आ. सोहळा चालू असतांना ‘मुलासाठी हवी असलेली मोठी रक्कम कुठून गोळा करणार ?’, हा विचार माझ्या मनात पुनःपुन्हा येत होता. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कोमल चरणी प्रार्थना केली, ‘गुरुदेवा, तुमच्या मुलाचे भविष्य तुम्हीच सांभाळा. आपणच काहीतरी करा.’ दुसर्‍या दिवशी नातेवाइकांचा भ्रमणभाष आला, ‘‘तुम्ही काळजी करू नका. आम्ही काही रक्कम गोळा करून देऊ शकतो.’’

हे सर्व गुरुदेवांच्याच कृपेने होऊ शकते. सर्वकाही त्यांनी सांभाळून घेतले. श्री गुरुदेवांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’              (सर्व सूत्रांचा दिनांक : १५.७.२०२१)


देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील साधकांना आलेल्या अनुभूती

२९.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सव निमित्त साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

१. सौ. प्रतिमा पुरोहित (वय ४२ वर्षे)

अ. दैवी बालक आणि युवा साधक यांच्या सत्संगातून ‘आपण साधनेसाठी न्यून पडतो’, याची जाणीव झाली.

आ. ‘आपली पात्रता नसतांना भगवंताने हा भावसोहळा अनुभवायला दिला’, याबद्दल मला कृतज्ञता वाटत होती.

इ. ‘प्रत्येक सेवा भगवंत मला शिकण्यासाठी आणि माझ्यामध्ये गुणवृद्धी होण्यासाठी देत आहे’, याची मला जाणीव झाली.’

२. सौ. देवयानी बने (वय ४८ वर्षे)

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मुखमंडल गुलाबी दिसत होते.

२. प.पू. गुरुमाऊली मला श्रीविष्णुरूपामध्ये दिसत होती.

३. माझ्याकडून प्रत्येक कृती आपोआप भावपूर्ण केली जात होती.’ (सर्व सूत्रांचा मास : मे २०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक