जयपूर (राजस्थान) – रमझान ईदच्या दिवशी येथील एका रस्त्यावर मुसलमानांकडून वाहतूक बंद करून नमाजपठण करण्यात येत असल्याचा आणि त्यामुळे जवळपास ५ किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. याविषयी भाजपने टीका करतांना ‘उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाचे हे उल्लंघन आहे’, असे म्हटले आहे. ज्या ठिकाणी नमाजपठण झाले तेथे ईदगाहचे ठिकाण आहे. येथे नमाजपठण करण्यास जागा न मिळाल्याने मुसलमानांनी रस्त्यावर नमाजपठण केले, असे सांगितले जात आहे. या वेळी येथे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तरीही त्यांनी रस्त्यावर नमाजपठण करण्यापासून मुसलमानांना थांबवले नाही. भाजपचे खासदार किरोडीलाल मीणा यांनी म्हटले की, राज्यातील काँग्रेस सरकारने लांगूलचालनाची परिसीमा गाठली आहे.
‘जयपुर में ईद पर नमाजियों ने सड़क की ब्लॉक, लगा 5KM जाम’ : रिपोर्ट्स में दावा, BJP सांसद बोले- गहलोत सरकार ने तुष्टिकरण की पराकाष्ठा पार कर दी#EID #Jaipur #Rajasthanhttps://t.co/a3vhJIbHeO
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 23, 2023
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात जनतेला वेठीस धरणारे मुसलमान आणि त्याविषयी मूक साक्षीदार बनलेले पोलीस आणि प्रशासन ! याविषयी कोणताही ढोंगी निधर्मीवादी आणि कायदाप्रेमी राजकीय पक्ष तोंड उघडणार नाही ! |