ज्ञानवापीमध्ये शिवलिंग सापडलेल्या ठिकाणी वजू करण्याची अनुमती देता येणार नाही !

उत्तरप्रदेशातील भाजप सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका

(वजू म्हणजे नमाजपठणापूर्वी हात-पाय धुणे)

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाजवळ वजू करण्याच्या मुसलमान पक्षाच्या मागणीला उत्तरप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध केला आहे. या संदर्भात न्यायालयाने मशीद आणि मंदिर पक्ष यांना जिल्हाधिकार्‍यांसमेवत बैठक घेऊन निर्णय घेण्यास सांगितले होते; मात्र या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने आता वाराणसी जिल्हाधिकार्‍यांना नमाजपठण करणार्‍यांना पाणी आणि शौचालय यांची व्यवस्था करण्याचा आदेश दिला.