दापोली नगरपंचायतीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून जिल्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई
रत्नागिरी – जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीतील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अन्वर रखांगे यांचा मुलगा फैजान रखांगे याला रत्नागिरी जिल्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून ९ एप्रिलला रात्री ८ वाजता अटक करण्यात आली. (असे भ्रष्टाचारी सदस्य असलेली राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचार कधी संपवेल का ? यावर राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी समर्थन केल्यास आश्चर्य वाटायला नको ! – संपादक)
दापोली नगरपंचायतीचे निलंबित कर्मचारी लेखापाल दीपक सावंत याने नगरपंचायतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवून त्याला यापूर्वीच पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. तो सध्या जामिनावरती मुक्त आहे. आता याच भ्रष्टाचाराच्या प्रकरणी फैजान रखांगे यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
दापोली नगरपंचायतीतील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक अन्वर रखांगे यांचा मूलगा फैजान याला रत्नागिरी जिल्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
दापोली नगरपंचायतीचे निलंबित कर्मचारी लेखापाल दीपक सावंत याने नगरपंचायतीमध्ये कोट्यावधी रुपयांचा
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) April 10, 2023
दापोली नगरपंचायतीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून या प्रकरणाचे अन्वेषण जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आले आहे. याच प्रकरणात फैजान रखांगे यांच्या खात्यावर दीपक सावंत यांनी अनुमाने दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वर्ग केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक फैजान रखांगे यांच्या अटकेसाठी लक्ष ठेवून होते; मात्र फैजान रखांगे गेले काही दिवस भारताबाहेर गेल्याची चर्चा होती. ते दापोलीत येताच त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.