सुरतमध्ये अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी हिना शेख हिला अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

सुरत (गुजरात) – अमली पदार्थाची तस्करी केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी हिना शेख नावाच्या मुसलमान महिलेला नुकतीच अटक केली. तिच्याकडून ५०७ ग्रॅम प्रतिबंधित ‘मेफेड्रोन ड्रग्ज’ जप्त करण्यात आले आहे. या अमली पदार्थाची किंमत ५० लाख रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. हिना शेख हिचा पती कारागृहात गेल्यापासून ती त्याचा अमली पदार्थांचा व्यवसाय सांभाळत होती.

एका वृत्तसंस्थेने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार, पोलिसांना एक बुरखाधारी महिला अमली पदार्थांचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकून तिला अटक केली.

संपादकीय भूमिका

  • अल्पसंख्यांक असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !