अमेरिकीतील शाळेत महिलेने केलेल्या गोळीबारात ३ विद्यार्थ्यांसह ६ जण ठार

नॅशविले (अमेरिका) – अमेरिकेतील टेनेसी राज्यातील नॅशविले येथील ‘द कॉव्हेंट स्कूल’ या ख्रिस्ती शाळेत ऑड्रे हेल (वय २८ वर्षे) नावाच्या महिलेने केलेल्या गोळीबारात ६ जण ठार झाले. यांत ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर लगेचच पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी आक्रमणकर्त्या महिलेला ठार केले.

या महिलेकडे २ रायफल्स आणि एक हँडगन होती. ‘या महिलेने गोळीबार का केला ?’, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही महिला या शाळेची माजी विद्यार्थिनी असल्याचे सांगितले जात आहे.