जेजुरी (पुणे) येथे वासरांची अवैध वाहतूक करणार्‍यांवर गुन्‍हा नोंद

प्रतिकात्मक छायाचित्र

जेजुरी (जिल्‍हा पुणे) – कोंढवा येथे गोवंशियांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होणार आहे, ही बातमी गोरक्षकांना मिळाली होती. (ही माहिती पोलिसांना का मिळत नाही ? – संपादक) त्‍यानुसार अक्षय कांचन आणि त्‍यांचे सहकारी गोरक्षक २४ मार्चच्‍या मध्‍यरात्री जेजुरी गावाच्‍या परिसरात असलेल्‍या खळद, कोथळे या ठिकाणी गेले असता त्‍यांना वध करण्‍याच्‍या उद्देशाने आणलेली ५ वासरे टेंपोमध्‍ये आढळली. पोलिसांनी वाहनचालक बाळू पवार आणि संजय चव्‍हाण याच्‍यावर गुन्‍हा नोंद केला आहे.