‘१२ ते १८.६.२०२२ या कालावधीत ‘दशम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे’, यासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी साकडे घालून त्याला अभिषेक घालण्यात आला. त्या वेळी सनातनचे साधक श्री. अनिकेत माने यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ रामनाथी आश्रमातील सिद्धिविनायकाला अभिषेक घालत होत्या. त्या वेळी ‘श्री गणपति त्यांच्याकडे निरागसपणे पहात आहे’, असे मला जाणवले.
२. सिद्धिविनायक भगवान शंकराच्या मांडीवर बसून आई भगवतीच्या हातून अभिषेक करून घेत आहे’, असे मला दिसले.
३. अभिषेक चालू असतांना काही क्षणांसाठी पाऊस आला. त्यामुळे ‘स्वर्गातून देवताही सिद्धिविनायकाला अभिषेक घालत आहेत’, असे मला वाटले.
४. मला चमेली आणि चंदन यांचे अन् अन्य काही सुगंध आलेे.’
– श्री. अनिकेत राजन माने, जामसंडे, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. (३.७.२०२२)
|