पणजी, ८ मार्च (वार्ता.) – येत्या २ दिवसांत गोव्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, अशी चेतावणी हवामान विभागाने दिली आहे. या २ दिवसांत नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा तापमान ४ ते ६ अंश सेल्सियस अधिक असेल; परंतु ११ मार्चनंतर हे तापमान २ ते ३ अंश सेल्सियसने खाली येईल. गेल्या २४ घंट्यांत पणजी येथे कमाल तापमान ३७ अंश सेल्सियस होते. हे नेहमीच्या तापमानापेक्षा ४ ते ६ अंश सेल्सियसने अधिक होते. मुरगाव येथे कमाल तापमान ३७.८ अंश सेल्सियस होते.