५३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा भुसावळ, जळगाव येथील कु. शिवप्रसाद उमेश जोशी (वय ६ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! कु. शिवप्रसाद उमेश जोशी हा या पिढीतील एक आहे !

कु. शिवप्रसाद जोशी

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. जन्‍मापूर्वी

अ. ‘मला गर्भारपणात ‘घरी न रहाता एखाद्या मंदिरात किंवा आश्रमात जाऊन रहावे’, असे वाटायचे. मी सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांना याविषयी सांगितल्‍यावर ते मला म्‍हणाले, ‘‘बाळाची पूर्वजन्‍मातील साधना असल्‍यामुळे तुम्‍हाला असे वाटत आहे.’’

आ. मला गर्भारपणाच्‍या तिसर्‍या मासात आधुनिक वैद्यांनी विश्रांती घ्‍यायला सांगितली होती. मला हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या प्रसाराला जायला आवडत होते. मी घरोघरी प्रचाराला जात असे.

इ. मला भजने ऐकायला आवडायची. मी पोटावर हात ठेवून नामजप केला की, मला बाळाची हालचाल जाणवायची.

ई. मला स्‍वप्‍नात रामनाथी आश्रमातील श्‍वेत रंगाची श्री गणपतीची मूर्ती दिसायची. मला श्री गणपति हसतांना आणि मोदक खातांना दिसायचा.

उ. मला वाटायचे, ‘माझ्‍या पोटी जन्‍माला येणारे बाळ धर्मकार्य करण्‍यासाठी गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या) कृपेने येत आहे.’

सौ. विनया उमेश जोशी

१ ऊ. नामजपादी उपाय केल्‍यामुळे आलेली अनुभूती : मला ८ व्‍या मासात रात्री १.३० वाजता अकस्‍मात् प्रसुती वेदना चालू झाल्‍या. आम्‍ही रुग्‍णालयात भ्रमणभाष केल्‍यावर ‘आधुनिक वैद्य सकाळी येणार’, असे आम्‍हाला कळले. तेव्‍हा मी रात्रभर नामजपादी उपाय केले. मी सकाळी रुग्‍णालयात गेल्‍यावर आधुनिक वैद्य आश्‍चर्य व्‍यक्‍त करत मला म्‍हणाले, ‘‘तुम्‍हाला इतक्‍या वेदना होत असतांना तुमची प्रसुती झाली नाही. बाळही सुखरूप आहे. तुमच्‍यावर देवाची कृपा आहे.’’

२. मी रुग्‍णालयात असतांना आधुनिक वैद्य माझ्‍या खोलीत आल्‍यावर म्‍हणायचे, ‘‘या खोलीत आल्‍यावर मला देवळात आल्‍याप्रमाणे प्रसन्‍न वाटते.’’

३. जन्‍मानंतर

३ अ. जन्‍म ते ३ वर्षे

१. शिवप्रसाद जन्‍मापासूनच शांत आणि सहनशील आहे. त्‍याला काही लागले, तरी तो दुखणे सहन करतो.

२. त्‍याने पहिला शब्‍द ‘ॐ’ असा उच्‍चारला.

३ आ. वय ३ ते ६ वर्षे

१. शिवप्रसादला त्‍याची चूक सांगितल्‍यावर तो लगेच स्‍वीकारतो.

२. तो घरात उदबत्ती लावणे, वास्‍तूशुद्धी करणे, अशा सेवा करतो.

४. स्‍वभावदोष :

हट्टीपणा आणि आळशीपणा.’

– सौ. विनया उमेश जोशी (कु. शिवप्रसादची आई), भुसावळ, जळगाव. (१६.९.२०२२)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या  https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक