भ्रमणभाषला ‘महाशून्‍य’च्‍या २ नामपट्ट्या लावल्‍यावर ‘इंटरनेट कनेक्‍शन’ त्‍वरित चालू होणे

सौ. प्रियांका चेतन राजहंस
कु. कौमुदी जेवळीकर

‘एकदा माझ्‍या भ्रमणभाषचे ‘इंटरनेट कनेक्‍शन’ अकस्‍मात् बंद झाले. मी या क्षेत्रातील तज्ञ साधकांचे साहाय्‍य घेतले, तरीही ‘इंटरनेट कनेक्‍शन’ चालू होत नव्‍हते. या सर्व गोष्‍टी करण्‍यात अनुमाने ४५ मिनिटे गेली. नंतर मी सौ. प्रियांका चेतन राजहंस (आध्‍यात्मिक पातळी ६९ टक्‍के, वय ३६ वर्षे) यांना याविषयी सांगितले. त्‍यांनी भ्रमणभाष हातात घेऊन प्रार्थना केली आणि सांगितले, ‘‘आपण याला ‘महाशून्‍य’ ही नामपट्टी लावूया.’’ तेव्‍हा त्‍यांनी भ्रमणभाषला ‘महाशून्‍य’च्‍या २ नामपट्ट्या लावल्‍यावर ५ मिनिटांतच ‘इंटरनेट कनेक्‍शन’ चालू झाले.’

– कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक