वॉशिंग्टन – वर्ष २०२३ मध्येच तिसरे महायुद्ध होईल, अशी भविष्यवाणी क्रेग हैमिल्टन पार्कर यांनी वर्तवली. २ विमाने किंवा २ पाणबुड्या यांच्यात टक्कर होईल आणि हेच तिसर्या महायुद्धाला कारणीभूत ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. क्रेग हैमिल्टन पार्कर यांनी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची अचूक भविष्यवाणी वर्तवली होती. या भविष्यवाणीनंतर त्यांना ‘आधुनिक नॉस्ट्रेडमस’ या नावाने ओळखले जाऊ लागले. मूळ नास्ट्रेडमस यानेही ‘२०२३ हे वर्ष जगासाठी महत्त्वाचे असेल’, असे म्हटले होते.
'नए नास्त्रेदमस' की खौफनाक भविष्यवाणी, 2023 में इस वजह से होगा तीसरा विश्वयुद्ध #news #dailyhunt https://t.co/bvwIDY2UVO
— Dailyhunt Hindi (@DH_Hindi) March 1, 2023
चीन आणि तैवान यांच्यात होईल संघर्ष !
क्रेग हैमिल्टन पार्कर पुढे म्हणाला की, तिसरे महायुद्ध हे रशिया-युक्रेन नव्हे, तर तैवानमुळे होईल. तैवानमध्ये एक भयानक विमान दुर्घटना होईल आणि तेच तिसर्या महायुद्धाचे कारण बनेल. या युद्धाचे परिणाम गंभीर असतील. चीन अनेक भागांमध्ये विखुरला जाईल.
(source: Craig Hamilton-Parker)
यापूर्वी जगात वर्ष १९१४ ते १९१९ या कालावधीत पहिले महायुद्ध, तर वर्ष १९३६ ते १९४५ या कालावधीत दुसरे महायुद्ध झाले आहे.