ढाका येथील हिंदूंची मंदिरे आणि घरे केली जात आहेत उद्ध्वस्त !

‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’चा दावा

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंदुत्वविरोधी मोहीम चालू केली आहे. ढाका, मीरपूर हिंदु कॉलनी येथील हिंदूंची मंदिरे आणि घरे सरकार उद्ध्वस्त करत आहे. मानवाधिकार संघटना आज आंधळ्या आहेत, असा आरोप ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या सातत्याच्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट नाकारता येत नाही ! पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी भारताचे चांगले संबंध असतांना बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !