नवी मुंबई, २० फेब्रुवारी (वार्ता.) – कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशी येथे शिवजन्मोत्सव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी व्याख्यानाचे आयोजनही करण्यात आले होते. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक, उपप्राचार्य प्रा. सी.डी. भोसले, उपप्राचार्या डॉ. राजश्री घोरपडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी आणि अध्यक्ष डॉ. एल्.व्ही. गवळी आदी उपस्थित होते.
१. यात ‘शककर्ते शिवराय’ या पुस्तकाचे पारायण करण्यात आले. स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, महिला संरक्षण प्रशिक्षण शिबीर, गडदुर्ग संवर्धन (माहुली गड), कापडी पिशव्या वाटप असे विविध उपक्रम राबवण्यात आले.
२. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी प्रातःकाली शिवज्योत महाविद्यालयात आणण्यात आली. या प्रसंगी शिवगर्जना देऊन शिवआरतीने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
३. ढोल-ताशांच्या गजरात लेझीम सादर करून ढोल-ताशा पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली. शिवजन्माचा पाळणा, पोवाडा, जागर, नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
४. शिवव्याख्याते वक्ते सुदर्शन भोईर यांचे प्रेरणादायी शिवव्याख्यान महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.