छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून भाजपच्या पदाधिकार्‍याची हत्या !

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सागर साहू यांची नक्षलवाद्यांकडून हत्या

रायपूर – बस्तरमधील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या नारायणपूर जिल्ह्यातील डोंगर भागात नक्षलवाद्यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सागर साहू यांची डोक्यात गोळ्या घालून हत्या केली.

अ. १० फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजता साहू घरात दूरदर्शन संच पहात असतांना ८ नक्षलवादी साहू यांच्या घरात घुसले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

आ. साहू यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

इ. साहू यांना मारण्यासाठी नक्षलवादी ग्रामस्थांची वेशभूषा करून आले होते. रात्री ८ वाजता त्यांनी साहू यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडल्यावर नक्षलवादी साहू यांच्या दिशेने धावले.

ई. त्यांच्यावर गोळ्या झाडतांना नक्षलवाद्यांनी ‘नक्षलवादी झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. साहू मागील २५ वर्षे भाजपमध्ये सक्रीय होते.

संपादकीय भूमिका 

काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय अपेक्षित आहे ? फोफावणारा नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यासाठी आता केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !