स्‍मृतीभ्रंश होऊनही केवळ श्रीकृष्‍ण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्‍मरण असणारे श्री. सत्‍यनारायण तिवारी !

स्‍मृतीभ्रंश होऊनही केवळ श्रीकृष्‍ण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्‍मरण असणारे संभाजीनगर येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. सत्‍यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) !

‘माझे वडील श्री. सत्‍यनारायण तिवारी (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) गेल्‍या २ वर्षांपासून रुग्‍णाईत आहेत. आधी ते दादा-वहिनी यांच्‍या समवेत संभाजीनगर येथे रहात होते. मी आणि आई (सुश्री. (कु.) आरती तिवारी आणि सौ. सविता तिवारी) गोवा येथे रहातो. सध्‍या बाबा गोवा येथे आमच्‍या समवेत रहात आहेत. बाबांच्‍या आजारपणात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा, बाबांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत. 

श्री. सत्‍यनारायण तिवारी

१. वडील रुग्‍णाईत असतांना त्‍यांची मनःस्‍थिती भ्रमिष्‍टासारखी होऊनही त्‍यांना श्रीकृष्‍ण आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे स्‍मरण होणे

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी

वडिलांच्‍या आजारपणात आरंभी त्‍यांचे वागणे आणि बोलणे भ्रमिष्‍टासारखे झाले होते. मध्‍येच ते लहान मुलांप्रमाणे वागत होते. त्‍यांना ‘घरात कुठे काय आहे ? कोण कुटुंबीय ? ते कुठे आहेत ?’, हे काहीच आठवत नव्‍हते. या दरम्‍यान त्‍यांना केवळ श्रीकृष्‍ण आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले एवढेच आठवत होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍या आजारपणाबद्दल काळजी न वाटता ‘त्‍यांना भगवंताचे स्‍मरण आहे’, याबद्दल मला प.पू. डॉक्‍टरांप्रती (परात्‍पर गुरु डॉक्‍टरांप्रती) पुष्‍कळ कृतज्ञता वाटून भावजागृती झाली.

२. ‘वडिलांचे वयोमान अधिक असल्‍याने शस्‍त्रकर्म न करता औषधोपचार करू’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे

त्‍यांची वैद्यकीय तपासणी केल्‍यावर आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘त्‍यांच्‍या डोक्‍यात गाठी झाल्‍याने ते भ्रमिष्‍टासारखे वागत आहेत.’’ त्‍या वेळी त्‍यांच्‍या हृदयाचा आलेख (इ.सी.जी) काढल्‍यावर त्‍यातही ‘काही त्रास आहेत’, असे लक्षात आले. वयोमान अधिक असल्‍याने शस्‍त्रकर्म करता येणे शक्‍य नव्‍हते. त्‍यामुळे ‘केवळ औषधोपचार करू’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले.

३. वडिलांचा स्‍मृतीभ्रंश होऊनही परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवल्‍यावर त्‍यांनी लगेच ओळखून नमस्‍कार करणे

त्‍यानंतर घरातल्‍या घरात २ वेळा वडील पडले. तेव्‍हा त्‍यांची पाठ आणि डोके यांना मार लागला. त्‍यांच्‍या डोक्‍यात अंतर्गत रक्‍तस्राव चालू झाला. त्‍यामुळे त्‍यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली. या स्‍थितीत स्‍मृतीभ्रंश वाढल्‍याने त्‍यांना अत्‍यल्‍प प्रमाणात स्‍मृती असायची. या स्‍थितीत वडिलांशी २ वेळा ‘व्‍हिडिओ कॉल’वर माझे बोलणे झाले. तेव्‍हा प.पू. डॉक्‍टरांचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) छायाचित्र दाखवल्‍यावर बाबांनी लगेच ओळखले आणि त्‍यांना नमस्‍कार केला.

४. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळेच वडील गुरुदेवांच्‍या अनुसंधानात आहेत’, याची जाणीव होऊन स्‍थिर रहाता येणे

बाबांनी कुटुंबियांना सांगितले, ‘‘मला प.पू. डॉक्‍टरांची भेट घालून द्या. मला माझ्‍या देवाकडे घेऊन जा.’’ मध्‍येच एकदा ते म्‍हणाले, ‘‘माझे भक्‍तराज महाराज कुठे आहेत ?’’ त्‍यांची ही स्‍थिती पाहून माझा भाव जागृत होत होता. ‘त्‍यांच्‍या देहाचे प्रारब्‍ध भोग आहेत; परंतु परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळेच बाबा गुरुदेवांच्‍या अनुसंधानात आहेत’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली. त्‍या वेळी मी आणि आई दोघी स्‍थिर झालो.

५. वडिलांची प्रकृती खालावल्‍याने त्‍यांनी दीड दिवसापासून काहीच खाल्ले नसतांना ‘आश्रमातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रसाद पाठवला आहे’, असे सांगितल्‍यावर वडिलांनी प्रसाद खाणे

वडिलांची प्रकृती खालावल्‍याने आई वर्ष २०२१ च्‍या गुरुपौर्णिमेपूर्वीच त्‍यांना भेटण्‍याच्‍या उद्देशाने गावी गेली. प्रकृती अस्‍वास्‍थ्‍यामुळे बाबांनी दीड दिवसापासून काहीच खाल्ले नव्‍हते. त्‍या वेळी ‘आश्रमातून गुरुदेवांनी (परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी) प्रसाद पाठवला आहे’, असे सांगितल्‍यावर बाबांनी प्रसाद खाल्ला. जेमतेम अर्धा घंटा ते आईशी बोलले आणि त्‍यांना पक्षाघाताचा (पॅरालीसिसचा) झटका आला. त्‍याच स्‍थितीत त्‍यांना रुग्‍णालयात नेले. तेव्‍हा ईश्‍वराच्‍या कृपेनेच आश्रमाच्‍या प्रसादाच्‍या माध्‍यमातून बाबांना चैतन्‍य मिळाले आणि आईला काही वेळ बाबांना भेटता आले. ही गुरुदेवांचीच कृपा !

६. ‘वडिलांची वयाच्‍या ७४ व्‍या वर्षी स्‍मृती परत येणे आणि शस्‍त्रकर्मानंतर जखम लवकर बरी होणे’, हे केवळ परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेनेच शक्‍य आहे’, याची जाणीव होणे

६ अ. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेला नामजप आणि औषधोपचार यांमुळे ३ – ४ मासांत वडिलांची वयाच्‍या ७४ व्‍या वर्षी स्‍मृती परत येणे : त्‍यानंतर बाबा १० दिवस रुग्‍णालयात होते. घरी आल्‍यावर सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेला नामजप आणि आधुनिक वैद्यांनी केलेल्‍या औषधोपचाराला मिळालेले यश यांमुळे साधारण ३ – ४ मासांनी वडिलांच्‍या प्रकृतीत अधिक प्रमाणात सुधारणा होऊ लागली आणि त्‍यांची स्‍मृती परत आली. वडिलांचे वय ७४ वर्षे आहे. ‘या वयात ‘विस्‍मृती’, हा रोग बरा होऊन स्‍मृती परत येणे’, हे केवळ परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेनेच शक्‍य आहे. त्‍यांच्‍यावर उपचार करणारे आधुनिक वैद्य, घरचे शेजारी, नातेवाईक यांनाही याचे आश्‍चर्य वाटले. त्‍यांना तपासण्‍यासाठी येणारे आधुनिक वैद्य, नातेवाईक सर्व जण सांगत की, त्‍यांना पॅरालिसीस, विस्‍मृती असे आजार होऊनही त्‍यांची स्‍थिती पुष्‍कळ चांगली आहे.

६ आ. ‘शस्‍त्रकर्मानंतर जखम लवकर बरी होणे’, हे केवळ परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेनेच शक्‍य आहे’, याची जाणीव होणे : वडिलांना रुग्‍णालयातून घरी आणल्‍यानंतर एके दिवशी ते अकस्‍मात् घसरून पडले. प.पू. डॉक्‍टरांच्‍या कृपेनेच वडिलांचे शस्‍त्रकर्म यशस्‍वी झाले. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘शस्‍त्रकर्मानंतरची जखम तुलनात्‍मक लवकर बरी झाली.’’ तेव्‍हा आम्‍हा सर्वांना ‘हेसुद्धा केवळ गुरुदेवांच्‍या कृपेनेच शक्‍य झाले’, याची जाणीव झाली.

७. वडील रुग्‍णाईत असतांना ‘नामजपादी उपाय, परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र जवळ ठेवणे आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने लावणे’ यांमुळे आध्‍यात्मिक त्रासावर मात करता येणे

७ अ. वडिलांना पूर्वजांचा त्रास होतांना दत्ताचा नामजप केल्‍यावर त्रास उणावणे आणि ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने नामजपादी उपायांद्वारे अनिष्‍ट शक्‍तींशी लढता आले’, याबद्दल कृतज्ञता व्‍यक्‍त होणे : त्‍यानंतर वडिलांना भेटण्‍याच्‍या उद्देशाने मी नोव्‍हेंबर २०२१ मध्‍ये संभाजीनगरला गेले होते. तेव्‍हा वडिलांनी मला सांगितले, ‘‘मला भेटायला सूक्ष्मातून अनेक पुरुष आणि स्‍त्रिया येतात. ते मला त्‍यांच्‍या समवेत येण्‍यास सांगतात.’’ तेव्‍हा ‘बाबांना सूक्ष्मातून दिसणारे लिंगदेह पूर्वजांचे आहेत. जे बाबांना त्रास देण्‍यासाठी येतात’, असे माझ्‍या लक्षात आले. काही वेळा बाबांना भीती वाटायची. ‘ते उंचावरून खाली पडत आहेत, त्‍यांना सूक्ष्मातून दिसणारे शेजारी असलेले लोक (लिंगदेह) त्‍यांना ढकलत आहेत’, असे त्‍यांना जाणवायचे. मी बाबांना म्‍हणाले, ‘‘त्‍यांना सांगा, माझे गुरु (प.पू. डॉक्‍टर) आहेत. तुम्‍ही मला काहीही करू शकत नाही. ते दिसत असतांना तुम्‍ही दत्ताचा नामजप करा.’’ बाबांनी तसा प्रयत्न केल्‍यावर त्‍यांचा त्रास उणावला. ‘प.पू. डॉक्‍टरांच्‍या कृपेने नामजपादी उपायांद्वारे अनिष्‍ट शक्‍तींशी लढता आले’, याबद्दल कृतज्ञता वाटली. ‘उपाय माहिती असले, तरी आध्‍यात्मिक त्रास लक्षात येणे आणि त्‍यावर मात करणे’, हे केवळ गुरुकृपेनेच शक्‍य आहे, याचीही मला प्रकर्षाने जाणीव झाली.

७ आ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र वडिलांच्‍या जवळ ठेवल्‍यावर त्‍यांचा रात्री झोपेत ओरडण्‍याचा त्रास उणावणे : काही दिवसांनी वडिलांना रात्री झोपेत ओरडण्‍याचा त्रास होऊ लागला. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र त्‍यांच्‍या जवळ त्‍यांना दिसेल, असे समोरच्‍या बाजूला लावल्‍यावर त्‍यांचा त्रास उणावला. परात्‍पर गुरु डॉ. आठवले त्‍यांचे क्षणोक्षणी रक्षण करत होते. जून २०२२ मध्‍ये बाबा गोवा येथे आमच्‍या वैयक्‍तिक निवासस्‍थानी आले. गोवा येथे आल्‍यावर त्‍यांचे रात्रीचे झोपेत बोलणे पूर्णपणे बंद झाले.

‘आश्रमातील महाप्रसादाचे चैतन्‍य, आश्रमातून प्रक्षेपित होणारे चैतन्‍य आणि बाबांच्‍या खोलीत दिवसरात्र प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने लावणे’, या सर्वांच्‍या परिणामामुळे त्‍यांना सूक्ष्मातून अनिष्‍ट शक्‍ती त्रास द्यायच्‍या, तो त्रास ८० टक्‍के उणावला आहे.

८. वडिलांमध्‍ये जाणवलेले पालट

८ अ. शारीरिक स्‍तरावर जाणवलेले पालट

१. गोवा येथे आल्‍यापासून वडिलांना होणारा शारीरिक त्रास उणावला असून त्‍यांच्‍या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे.

२. त्‍यांच्‍या तोंडवळ्‍यावर तेज जाणवत आहे.

३. बाबांचे हसणे निरागस लहान बाळाप्रमाणे झाले आहे.

८ आ. मानसिक स्‍तरावर जाणवलेले पालट

१. एकदा बाबा मला म्‍हणाले, ‘‘माझे तुला किती करावे लागते. मला क्षमा कर.’’ तेव्‍हा ‘बाबांच्‍या मनात अपराधीपणा आणि कृतज्ञताभाव असून इतरांचा विचार करणे, हा गुणही अधिक प्रमाणात आहे’, असे मला जाणवले.

२. बाबांचे काही चुकल्‍यास ते आईला ‘मला क्षमा कर’, असे म्‍हणतात. एवढे रुग्‍णाईत असूनही त्‍यांना क्षमायाचना आणि प्रार्थना करणे लक्षात रहाते’, याचे मला नवल वाटते.

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍याच कृपेने मला वडिलांच्‍या सहवासात त्‍यांचे हे आध्‍यात्मिक पैलू लक्षात आले. ‘प.पू. डॉक्‍टरांच्‍या कृपेमुळे मला असे वडील लाभले’, त्‍याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञ आहे.’

– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१०.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक