‘गोव्यातील कळंगुट आणि कांदोळी किनारपट्टी भागांत पर्यटन शॅकधारक आणि इतर व्यावसायिक यांनी जागोजागी अवैधरित्या कुपनलिका (बोअरवेल) खोदल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढतांना सरकारकडे ‘या प्रकरणी कारवाई का केली नाही ?’, याचे स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच ज्यांनी शौचालयाचे शोष खड्डे (सोक पिट) आणि कुपनलिका खोदल्या आहेत, त्या सर्वांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून १७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत स्पष्टीकरण मागवण्याचा आदेश खंडपिठाने दिला आहे, यासह २२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत कार्यवाही अहवाल सुपूर्द करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पर्यटन खात्याला सहकार्य करण्याचा आदेश न्यायालयाने कळंगुट पोलिसांना दिला आहे.’ (९.२.२०२३)