वणी (जिल्‍हा यवतमाळ) येथून गायींची चोरी रोखण्‍यासाठी ठाणेदारास निवेदन !

वणी पोलीस ठाणे

वणी (यवतमाळ), ३१ जानेवारी (वार्ता.) – येथील राष्‍ट्रहित संवर्धन समितीने पोलीस ठाणेदारास वणी शहर आणि परिसर येथील गायींची चोरी रोखण्‍यासाठी निवेदन दिले. ५ गायींची चोरी झाल्‍याची माहिती गायींच्‍या मालकांनी समितीला दिल्‍याने हे निवेदन दिले. ठाणेदार प्रदीप शिरस्‍कर यांनी कारवाईचे आश्‍वासनही दिले. यापूर्वीही गायींच्‍या चोरीची प्रकरणे घडली आहेत.

संपादकीय भूमिका

निवेदन देण्‍याची वेळ का येते ? पोलीस स्‍वतःहून त्‍यांचे कर्तव्‍य पार का पाडत नाहीत ?