पुणे – येथील कोंढवा, शिवनेरीनगर, बाबाजान मशिदीजवळ १४ जानेवारी या दिवशी सराईत गोतस्कर मलंग कुरेशी याने ३ गोवंश कत्तलीसाठी डांबून ठेवले असल्याची माहिती गोरक्षक राहुल कदम यांना मिळाली होती. त्यानुसार द्वारकाधीश गोशाळा येथील गोरक्षक राहुल कदम, अभिषेक धांडेकर, विनायक लोखंडे आदी पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी गेले. उपनिरीक्षक फापट आणि पोलीस हवालदार किरण नेवसे आदींच्या सहकार्याने कारवाई केली, तसेच सर्व गायी द्वारकाधीश गोशाळेत सोडण्यात आल्या आहेत.
संपादकिय भुमिकागोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता अशा घटनांमधून स्पष्ट होते. प्रशासन आतातरी ते करणार का ? |