५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला परभणी येथील कु. प्रद्युम्न श्रीनिवास दिवाण (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. प्रद्युम्न श्रीनिवास दिवाण हा या पिढीतील एक आहे !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

‘वर्ष २०१७ मध्ये ‘कु. प्रद्युम्न दिवाण उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून तो ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५२ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१५.१०.२०२२)

१. समंजस

कु. प्रद्युम्न दिवाण

‘कु. प्रद्युम्न आमच्या समवेत सेवेसाठी बाहेर आल्यावर शांत असतो. तो खोड्या किंवा हट्टीपणा करत नाही. आम्ही सेवा करून घरी आल्यावर तो आमची विचारपूस करतो आणि आम्हाला पाणी आणून देतो.

२. इतरांना साहाय्य करणे

त्याची आई रुग्णाईत असल्यास तो आईला घरकामात साहाय्य करतो.

३. धर्माचरणी

सौ. स्वाती दिवाण

त्याला टिळा लावायला आवडतो. त्याला सात्त्विक वेशभूषा आणि केशभूषा करायला आवडते. तो अन्य धर्मियांकडून फळे, भाज्या किंवा अन्य साहित्य घेऊ नको, असे सांगतो. ‘विक्रेता हिंदू आहे ना ?’, याची तो निश्चिती करतो. त्याचे आजोबा एकदा त्यांच्या मित्रांशी बोलत असतांना त्याने त्यांना सांगितले, ‘‘आपण हस्तांदोलन न करता नमस्कार करायला हवा !’’

४. व्यष्टी साधना

अ. प्रद्युम्न बगलामुखी स्तोत्र, देवीकवच, श्रीरामरक्षा, मारुतिस्तोत्र, गणपतिस्तोत्र आणि गणपति अथर्वशीर्ष ऐकतो.

आ. तो गुरुदेवांच्या छायाचित्राची नियमितपणे भावपूर्ण पूजा करतो. तो पूजेसाठी फुले आणणे, नैवेद्य दाखवणे इत्यादी सेवा भावपूर्ण करतो.

इ. तो ३० वेळा प्रार्थना-कृतज्ञता व्यक्त करतो. तो गुरुदेव आणि गुरुपादुका यांचे ३० वेळा स्मरण करतो. तो १५ वेळा भावजागृतीचे प्रयत्न करतो.

५. चुकीविषयी संवेदनशीलता

श्री. श्रीनिवास दिवाण

त्याच्याकडून चूक झाल्यास तो आईची क्षमा मागतो.

६. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचनाची आवड

त्याला दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला आवडते. त्याला त्यातील काही समजत नसल्यास तो त्याच्या वडिलांना विचारतो.

७. जाणवलेले पालट

तो मनमोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यात काही प्रमाणात पालट जाणवत आहे. त्याची पूर्वीपेक्षा ऐकण्याची वृत्ती वाढली आहे.

८. स्वभावदोष

‘एकाग्रता नसणे, प्रतिमा जपणे, वक्तशीरपणाचा अभाव, भावनाप्रधानता.’

– सौ. स्वाती दिवाण (आई) आणि श्री. श्रीनिवास दिवाण (वडील), परभणी (१०.५.२०२२)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.