येत्या प्रजासत्ताकदिनाला इजिप्तचे राष्ट्रपती असणार प्रमुख पाहुणे !

इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल् सीसी

नवी देहली – येत्या २६ जानेवारी २०२३ च्या प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाला इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल् सीसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

गेल्या मासामध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इजिप्तच्या दौर्‍याच्या वेळी राष्ट्रपती अब्देल सिसी यांची भेट घेतली होती.

वर्ष २०२१ मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते; मात्र ब्रिटनमधील कोरोनाचा वाढता प्रकोप पहाता त्यांनी उपस्थित रहाण्यास असमर्थता दर्शवली होती. वर्ष २०२२ मध्येही कोरोना महामारीमुळे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला कुणी उपस्थित नव्हते.