मेरठ (उत्तरप्रदेश) येथील शाळेतील मुसलमान विद्यार्थी शिक्षिकेला म्हणतात ‘आय लव्ह यू !’

शिक्षिकेकडून पोलिसांत तक्रार

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील डॉ. राम मनोहर स्मारक इंटर कॉलेजमधील एका शिक्षिकेला अमन, अतश आणि कैफ हे विद्यार्थी ‘आय लव्ह यू’ (मी तुझ्यावर प्रेम करतो) असे म्हणतांनाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. प्रारंभी या शिक्षिकेने याकडे दुर्लक्ष केले होते; मात्र हा प्रकार सतत होऊ लागल्यावर तिने महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि पोलीस यांच्याकडे तक्रार केली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

संपादकीय भूमिका

मुसलमान तरुण एकीकडे ‘लव्ह जिहाद’च्या कारवाया करत असतांना विद्यार्थीदशेतील मुसलमान मुले कोणत्या मानसिकतेची आहेत, हे या घटनेतून लक्षात येते ! अशी मुले मोठी झाल्यावर काय करणार ? हे वेगळे सांगायला नको !