वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
सोलापूर, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – येथे २३ नोव्हेंबर या दिवशी वैराग येथे जनावरांचा बाजार भरतो. सोलापूर येथील बजरंग दल गोरक्षा विभागातील गोरक्षकांनी सतर्कतेने बाजारातून गोवंशियांची तस्करी करणार्या चारचाकी वाहनाचा पाठलाग करत १३ गोवंशियांचे प्राण वाचवले. गोरक्षकांनी वाहनाची पहाणी केली असता सर्व गोवंशियांना दाटीवाटीने दोरीने बांधल्याचे आढळले. याविषयी गोसेवा जिल्हाध्यक्ष सिद्राम चरकुपल्ली यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई करण्यासाठी वैराग पोलीस ठाणे येथील पोलिसांचे सहकार्य लाभले. या वेळी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, केशव प्रखंड सहसंयोजक पवनकुमार कोमटी, लक्ष्मी राज गणपति प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजन सिरसिल्ला, गोरक्षक विनायक निकते, मानद पशू कल्याण अधिकारी अविनाश कैय्यावाले, तसेच पवन बल्ला, राहुल लंगडेवाले, अविनाश मदनावाले, अभिषेक नागराळे, शुभम वाघमोडे आदी उपस्थित होते. या वेळी सर्व गोवंशियांना सोलापूर-बार्शी रस्त्यावरील अहिंसा गोशाळेत सोडण्यात आले.
संपादकीय भूमिका‘अनेकदा गोरक्षकच गोवंशियांचे प्राण कसे काय वाचवतात ? याचा विचार पोलिसांनी करायला हवा’, असेच गोप्रेमींना वाटते ! |