बहुविवाह आणि निकाह हलाला यांवर बंदी घालण्याच्या याचिकेवर सुनावणीसाठी घटनापिठाची स्थापना होणार !

(निकाह हलाला म्हणजे म्हणजे तलाक दिल्यानंतर पुन्हा त्याच पतीशी विवाह करण्यापूर्वी दुसर्‍या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवणे)

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने बहुविवाह आणि निकाह हलाला या प्रकरणांवर सुनावणी करण्यासाठी घटनापीठ स्थापन करण्यास अनुमती दिली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने ही अनुमती दिली.

ज्येष्ठ अधिवक्ता आणि भाजपचे नेते अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या याचिकेद्वारे मुसलमानांमधील बहुविवाह निकाह हलाला यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.