ओडिशामध्ये रुळावरून घसरलेली मालगाडी रेल्वे स्थानकामध्ये घुसल्याने ३ जणांचा मृत्यू

भुवनेश्‍वर (ओडिशा) – राज्यातील जाजपूर जिल्ह्यात असलेल्या कोरेई रेल्वे स्थानकावर सकाळी पावणे सातच्या सुमारास एक मालगाडी रुळावरून घसरली आणि स्थानकातील प्रतिक्षालयामध्ये (‘वेटिंग रूम’मध्ये) घुसली. यात ३ जणांचा मृत्यू झाला, तर काही जण घायाळ झाले. घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघातामुळे येथील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.