तामिळनाडू येथे बाटग्या ख्रिस्त्यांनी महिलेचा मृतदेह ३ दिवस घरात ठेवला !

प्रार्थना केल्यास महिला जीवित होईल, अशी कुटुंबियांची धारणा !

मदुराई (तामिळनाडू) – प्रार्थनेच्या माध्यमातून मृत झालेली महिला पूनर्जीवित होईल, या भाबड्या आशेपायी बाटग्या ख्रिस्ती कुटुंबियांनी महिलेचा मृतदेह ३ दिवस घरातच ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. शेजार्‍यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यावर मूळ गावी नेऊन तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

१. मदुराई येथील एका हॉटेलचे व्यस्थापक असलेले बाळकृष्णन्, त्यांची पत्नी आणि २ मुले यांनी काही वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. मोठा मुलगा आधुनिक वैद्य (डॉक्टर) असून धाकटा मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

२. बाळकृष्णन् यांची पत्नी मलाठी यांना हृदयविकार असल्याने त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आला. ३ दिवसांनंतरही त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत, तेव्हा शेजार्‍यांनी पोलिसांत तक्रार केली.

३. पोलिसांनी अंत्यसंस्कार करण्याविषयी विचारले असता, ‘पाद्य्राची वाट पहात आहोत’, असे बाळकृष्णन् यांनी सांगितले. बाळकृष्णन् आणि त्यांची २ मुले यांना ‘प्रार्थनेच्या माध्यमातून मलाठी पूनर्रोजीवित होईल’ अशी आशा होती.

४. वर्ष २०२१ मध्ये घडलेल्या अन्य एका घटनेत धर्मांतरित कुटुंबातील एका महिलेला पाद्य्राने ‘रुग्णालयात भरती केल्यास येशू वाचवणार नाही’, असे सांगत तिला रुग्णालयात भरती होऊ दिले नाही. (अशा पाद्य्रांविषयी पुरो(अधो)गामी तोंड का उघडत नाहीत ? – संपादक)

५. पुढे त्या महिलेचा मृत्यू झाल्यावर तिच्या १३ आणि ९ वर्षांच्या मुलांना मृतदेहासोबत २० दिवस ठेवण्यात आले होते. त्यावेळीही पोलिसांनी हस्तक्षेप करून अंत्यसंस्कार करायला लावले होते.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंनी अशी कृती केली असती, तर एव्हाना बुद्धीप्रामाण्यवादी, पुरो(अधो)गामी आणि अंनिसवाले यांनी हिंदूंवर टीका केली असती; मात्र हीच कृती ख्रिस्त्यांनी केल्यामुळे ही टोळी ‘ब्र’ही काढणार नाही, हे लक्षात घ्या !
  • प्रार्थनेद्वारे रोग बरे करणे, तसेच अन्य आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर केले जाते. हिंदूही या आमिषांना बळी पडतात. अशांनी या घटनेतून बोध घ्यावा !