धर्मांधाकडून आजाराचे निमित्त करून सतत रुग्णालयात येऊन महिला डॉक्टरशी छेडछाड

धर्मांध तौहीद अली

कानपूर (उत्तरप्रदेश) – धर्मांधाने आजाराचे निमित्त करून सातत्याने रुग्णालयात येऊन महिला डॉक्टरशी छेडछाड केल्याची घटना येथे घडली. तौहीद अली असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी अली उपचारांसाठी पीडित डॉक्टर काम करत असलेल्या रुग्णालयात आला होता. त्या वेळी त्याला त्याच्या आजारानुसार औषधे देण्यात आली होती. तथापि अली हा काही ना काही कारण काढून सतत रुग्णालयात येऊन पीडित महिला डॉक्टरकडे एकटक बघत होता. यासह तेथील विविध कर्मचार्‍यांना तो पीडित महिला डॉक्टरांविषयीची सतत माहिती विचारत होता. इतकेच नव्हे, तर पीडिता घरी जातांना तो तिचा पाठलागही करत होता. आरंभी पीडित महिला डॉक्टरने त्याच्याकडे दुर्लक्ष केले; परंतु नंतर तिने याविषयी तिच्या सहकार्‍यांना माहिती दिली. यानंतर सहकार्‍यांनी त्याला माहारण करत पोलिसांच्या कह्यात दिले.

संपादकीय भूमिका

धर्मांधांची वासनांधता जाणा ! अशांवर उपचार न करण्याची भूमिका डॉक्टरांकडून घेतली गेल्यास आश्‍चर्य वाटू नये !